मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाकडुन मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर होत आहे. असे असुनही मुंबई मनपाला पूर्ण यश मिळाले नाही. कारण अनेक मोठ्या नाल्यांचे अस्वच्छ पाणी मिठी नदी मध्ये येते. आता मुंबई मनपाने मिठी नदीत येणाऱ्या नाल्यांच्या साफसफाईसाठी देखील मशीनचा वापर केला जाईल. यामुळे मिठी नदी स्वच्छ होण्यास मदत होईल.
मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी सिल्ट पुशिंग मशीन आणि मल्टीपर्पज एम्फीबी मशीन वापरली जातात. या मशीनचा वापर करून मुंबई शहर आणि उपनगरातील ते मोठे नाले देखील स्वच्छ केले जातील, ज्यांचे पाणी मिठी नदीत येते. यामुळे नाल्यांमधील पाणी मिठीत नदीत जाण्याआधीच त्यातील कचरा, प्लास्टिक वेगळे काढले जाईल.
कसा असणार मिठी नदी स्वच्छतेचा पुढचा टप्पा?
- मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मुंबई मनपाने सीवरेजचा प्रवाह थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- कुर्ल्यामध्ये मिठी नदीला जोडले जाणाऱ्या दोन नाल्यांचे घाण पाणी धारावीच्या सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ६ किमी भूमिगत बोगदा बनवून आणण्याची योजना आहे.
- सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मुंबई मनपाची मान्यता मिळाली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असा बोगदा बांधला जाईल.
- हा बोगदा दरवर्षी अंदाजे १६८ दशलक्ष लिटर सीवरेज पाणी धारावी ट्रीटमेंट प्लांटला २०५१ पर्यंत पाठवू शकेल.
- हा बोगदा २.६ मीटर व्यासाचा आणि ६.५ किमी लांब असेल.
मुंबई मनपाला होतोय रोजच दंड!
- आता या कामांना गती दिल्याशिवाय मुंबई मनपाकडे पर्याचय नाही.
- कारण परंतु वेळेवर कृती योजना योग्यरित्या अंमलात न आणल्यामुळे मुंबई मनपा एप्रिल २०२० पासून दंड भरत आहे.
- ग्रीन ट्रीब्युनल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९ मध्ये मुंबई मनपाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचे निर्देश दिले होते.
- याच आधारावर, मुंबई मनपाने एक कृती आराखडा तयार केला आहे, मिठी नदीची स्वच्छता केली आहे आणि कामाच्या सद्यस्थितीची रूपरेषा सादर केली आहे.