Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंतराळातील पहिली शुटिंग यशस्वी, पॅकअपनंतर रशियन कलाकार पृथ्वीवर परतले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
space

मुक्तपीठ टीम

एका रशियन चित्रपटाची शुटिंग, ती ही अंतराळात! आश्चर्य वाटलं ना? हो हे घडलंय प्रत्यक्षात. रशियातील एका चित्रपटामधील ३५ ते ४० मिनिटांच्या दृश्यांचे चित्रीकरण १२ दिवस अंतराळातील स्पेस स्टेशनवर झाले. आता ही टीम नुकतीच पृथ्वीवर परतली आहे.

 

रशियन ‘चॅलेंज’ चित्रपटातील एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी ही टीम अंतराळात गेली होती. अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १२ दिवस घालवलेल्या क्रूमध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लीम शिपेन्को यांचा समावेश होता. आता ही टीम अनुभवी अंतराळवीर ओलेन नॉविस्कीसह परत आली आहे. ते ISS वर १९१ दिवस उपस्थित होते.

 

या क्रूच्या स्पेस शटलने रविवारी सकाळी ६.४५ वाजता (भारतीय वेळेनुसार) स्पेस स्टेशनवरून उड्डाण केले आणि सुमारे साडेतीन तासांनी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी कझाकिस्तानमध्ये यशस्वी लँडिंग केले. लँडिंगनंतर संपूर्ण क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

अवकाशात ३५ मिनिटांचे दृश्यासाठी १२ दिवस शुटिंग

  • चित्रपटाच्या टीमला ‘चॅलेंज’ च्या शूटिंगसाठी खास प्रशिक्षण देण्यात आले होते.
  • ‘चॅलेंज’ चे वेगवेगळे सीन्स शूट करण्यासाठी, फिल्म टीमने १२ दिवस अंतराळात घालवताना आयएसएसवर ३५ ते ४०मिनिटांचा लांब सीन शूट केला.
  • या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा आहे जी अंतराळयात शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अंतराळवीराला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण जाते.
  • आयएसएसवर असलेले अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव आणि प्योत्र डुबरोव्ह यांनीही चित्रपटाच्या या दृश्यात भूमिका केली आहे.

 

रशियाने हॉलिवूडला मागे टाकले

  • ‘चॅलेंज’ चित्रपटाच्या शूटिंगसह, रशियाने हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक टॉम क्रूज यांना मागे टाकले आहे.
  • ज्यांनी नासा आणि एलोन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स यांच्या सहकार्याने २०२० मध्ये अंतराळात चित्रपट शूट करण्याची घोषणा केली होती.
  • मात्र, अंतराळात रशिया आणि अमेरिका यांच्यातील ही स्पर्धा नवीन नाही.
  • अंतराळ मोहिमांची स्पर्धा सुरु होताच रशियाने स्पुटनिक आकाशात सोडून अमेरिकेला मागे टाकले होते, पण चंद्रावर पहिला माणूस पाठवून अमेरिकेने उट्टे काढले होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: challenge moviemuktpeethRussiarussian movieshootingSpacespace stationअंतराळचॅलेंज चित्रपटमुक्तपीठरशियन चित्रपटरशिया
Previous Post

राज्यात १,४८५ नवे रुग्ण, २,०७८ रुग्ण बरे!

Next Post

मिठी नदी स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचं पुढचं पाऊल, जोडणारे नालेही यंत्राने स्वच्छ करणार!

Next Post
bmc

मिठी नदी स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचं पुढचं पाऊल, जोडणारे नालेही यंत्राने स्वच्छ करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!