Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतासाठी रशियातून माल घेऊन येणारी पहिली रेल्वेगाडी इराणमध्ये पोहचली!

आता माल समुद्रमार्गे भारतात!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
russia-iran-india

मुक्तपीठ टीम

भारतासाठी माल घेऊन जाणारी पहिली रशियन ट्रेन इराणला पोहोचली आहे. ही ट्रेन प्रथमच आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर वापरून कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान मार्गे इराणला पोहोचली आहे. ट्रेनने आतापर्यंत ३ हजार ८०० किमी अंतर पार केले आहे. मालवाहतूक करणारे ३९ कंटेनर आहेत, जे भारतात आणायचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर असलेल्या देशाच्या सरखास रेल्वे स्थानकावर १३ जुलै २०२२ रोजी ही ट्रेन पोहोचली आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हा ७,२०० किमी लांबीचा मल्टी-मोड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे. याद्वारे इराण, भारत, आर्मेनिया, अफगाणिस्तान, अझरबैजान, रशिया, युरोप आणि मध्य आशियामध्ये मालाची वाहतूक शक्य होणार आहे.

रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून रशियातून भारतात माल होणार आयात

  • या प्रकल्पाला भारताचा पाठिंबा आहे.
  • इराणच्या सरखास रेल्वे स्थानकावर येणारी एक रशियन ट्रेन मालवाहू कंटेनर बंदर अब्बास बंदरापर्यंत पोहोचवेल, जे स्टेशनपासून १ हजार ६०० किमी अंतरावर आहे.
  • तिथपर्यंत रेल्वे मार्ग असून त्यानंतर हे कंटेनर सागरी जहाजात भरून भारतात पाठवले जातील.
  • रशियातून भारतात माल घेऊन जाणाऱ्या या ट्रेनच्या स्वागतासाठी इराणमध्येही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • यामध्ये परिवहन मंत्री, उद्योग मंत्री, तेल मंत्री आणि स्वतः उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर हे देखील उपस्थित होते.

उपराष्ट्रपती मोखबर या कार्यक्रमात म्हणाले की, इराण आपल्या शेजारी देशांसोबत व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी तयार आहे. भारताकडे माल घेऊन जाणारी ट्रेन ६ जुलै रोजी रशियाच्या चेखोव्ह स्टेशनवरून निघाली होती आणि कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान मार्गे एकूण ३ हजार ८०० किमी प्रवास करून इराणला पोहोचली होती. भारत आणि रशियादरम्यान ही बिझनेस ट्रेन अशा वेळी प्रवास करत आहे जेव्हा युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पाश्चिमात्य जगाच्या विरोधानंतरही दोन्ही देशांमधील संबंध किती वेगाने पुढे जात आहेत, हे यावरून स्पष्ट होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील आठवड्यात इराणला जाणार आहेत. यादरम्यान ते परिसरातील कनेक्टिव्हिटीबाबतही बोलतील.

 

पाहा व्हिडिओ: 

 


Tags: freight traingood newsIndia by seaIndia-RussiaIranmuktpeethRussian trainइराणघडलं-बिघडलंचांगली बातमीभारत-रशियामालवाहू रेल्वेमुक्तपीठरशियन ट्रेनसमुद्रमार्गे भारतात
Previous Post

उत्तर कोकणातील जव्हारचे धबधबे, धरतीवर उधळलं जाणारं उसळतं सौंदर्य!

Next Post

मुंबई-दिल्ली दरम्यान वीजेवर चालणार बस-ट्रक!

Next Post
Union Transport Minister Nitin Gadkari

मुंबई-दिल्ली दरम्यान वीजेवर चालणार बस-ट्रक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!