Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर कोकणातील जव्हारचे धबधबे, धरतीवर उधळलं जाणारं उसळतं सौंदर्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Jawhar Waterfalls

गौरव संतोष पाटील

बरसणाऱ्या आभाळमायेनं सध्या नद्या-नाले तुडुंब वाहतायत. त्यांचे प्रवाह डोंगरकड्यांवरून धबाधब्यांच्या रुपानं धरतीवर सौंदर्य उधळतायत. ते उसळतं सौंदर्य डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळतेय.

महाराष्ट्रात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडतोय. पाण्याचं वेगवान सौंदर्य पर्यटकांना भावतंच भावतं. उत्तर कोकणातील
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने चांगला पाऊस सुरू आहे. त्यातही जव्हार भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. डोंगरातून वाहणारे झरे आणि धबधबे खळखळून वाहायला सुरुवात झाली आहे. जव्हारचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेलं कासटवाडी येथील झरे खळखळून व्हायला सुरुवात झाले आहेत.

जव्हार हे पालघरमधील मिनी महाबळेश्वर समजलं जातं. पावसाळा सुरू झाला की येथील वातावरण रमनीय बनते. जव्हार भागातील ही पर्यटन स्थळं पर्यटकांना भुरळ घालतात.हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक असल्यानं पर्यटकांची गर्दी उसळते.

दाट धुकं आणि कोसळणारे धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे हिरवाईच हिरवाई दिसत असल्याने बाराही महीने वातावरण प्रसन्न असतं. दाभोसा आणि हिरड पाडा या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचींवरून हे पाणी खाली पडतं, तितक्याच वेगाने त्याचे तुषार ५०-६० फुटांपर्यंत वर उडतात. चारही बाजुने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता तसच धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट. हे दृश्य खूप मनोहारी आणि विलोभनीय असल्याने पर्यटकांना भावतं.
सध्या पर्यटकांची गर्दी या दाभोसा या गावी वाढत चालली आहे. त्याचं कारण डोंगराच्या कुशीत वसलेले दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे म्हणजे निसर्गाचं अतुलनीय असं कोसळतं सौंदर्य…डोळ्यांना सुखावणारं.

पालघर जिल्हयासह मुंबई तसच गुजरात ,नाशिक आणि सिलवासा मधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्यावर मजा लुटन्यास येत आहेत . या धबधब्याच वैशिष्ठ म्हणजे हा धबधबा बाराही महीने सुरु असल्याने पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो . मात्र वर्षाऋतुत धबधब्या बाजूला असलेली हिरवाई दिसत असल्याने या दोन्ही धबधब्याच सौंदर्य अधिक खुलून दिसते. या मुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथे येताना पहायला मिळतात .

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsJawhar WaterfallsmuktpeethnatureNorth KonkanPalgharउत्तर कोकणऔषधे व सौंदर्य प्रसाधने कायदाघडलं-बिघडलंचांगली बातमीजव्हार धबधबेधबधबे सौंदर्यनिसर्गपालघरमुक्तपीठ
Previous Post

राज्यात २२२९ नवे रुग्ण, २५९४ रुग्ण बरे! मुंबई ३३९, नाशिक २९, नागपूर ३० नवे रुग्ण !!

Next Post

भारतासाठी रशियातून माल घेऊन येणारी पहिली रेल्वेगाडी इराणमध्ये पोहचली!

Next Post
russia-iran-india

भारतासाठी रशियातून माल घेऊन येणारी पहिली रेल्वेगाडी इराणमध्ये पोहचली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!