मुक्तपीठ टीम
भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह (जीआयएसएटी -१) एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात अंतराळात झेपावेल. भारतीय अवकाश संशोधन संघटना म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष के शिवन यांनी ही माहिती दिली. हा उपग्रह म्हणजे अवकाशात भारताचे डोळे असतील.
शिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचे बारकाईने निरीक्षण करणारा जीआयएसएटी -१ हा देशातील पहिला उपग्रह आहे. जीआयएसएटी -१ हा पृथ्वीचा प्रत्येक भाग बारकाईने पाहणारा देशातील पहिला उपग्रह असेल. त्याला पृथ्वीपासून ३५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये स्थापित केले जाईल. हा उपग्रह अवकाशात भारताचे डोळे म्हणून काम करेल.
यापूर्वी ५ मार्च २०२० ला हे लाँच केले जाणार होते. परंतु लॉन्च करण्याच्या काही तास आधी तांत्रिक कारणांमुळे ते थांबविले गेले. यानंतर, कोविड साथीच्या आणि देशामध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढे ढकले गेले. यानंतर, त्याच्या प्रक्षेपणाचा नवीन कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला. २,२६८ किलो वजनाचा जीआयएसएटी -१ उपग्रह पृथ्वीची रिअल टाइम प्रतिमा प्रदान करेल. त्या प्रतिमेचे त्वरित विश्लेषण आणि विलंब न करता निष्कर्ष काढता येतील. त्यामुळे देशाला संरक्षण आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस खूप फायदा होईल.
पाहा व्हिडीओ: