Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आगडोंब! मुंबईत गोदाम, पुण्यात फॅशन स्ट्रिट खाक

March 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
mumbai pune fire

मुक्तपीठ टीम

 

ड्रीम मॉल आगीच्या दुर्घटनेनंतर आज मुंबई येथील प्रभादेवी परिसरातील गॅमन हाऊस इमारतीमधील गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे पुण्याच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कापडाची दुकान आणि गोदामे असल्याने आग अधिक पसरण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, मुंबईतील प्रभादेवी येथील आगीला विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.

 

मुंबईच्या प्रभादेवीमध्ये लागलेली ही आग तळघरात लागल्याने आगीवर नियंत्रण आणणे अग्निशमन दलाला कठिण जात आहे. त्यामुळे आग विझवणे हे अग्निशमन दलासमोरील मोठे आव्हान असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर गोदामाला पहाटे ५ वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सिक्योरिटी गार्डने आग लागल्याचे पाहाताच तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. तसेच हे इलेक्ट्रिक वायरचे हे गोदाम असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने येथे कोणीतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

फॅशन स्ट्रीट मार्केट जळून खाक

पुण्यातील महात्मा गांधी रोडवर फॅशन स्ट्रीट मार्केट आहे. तेथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याआधीच आग फॅशन स्ट्रीटवरील शेकडो दुकानांमध्ये पसरली होती. आगीच्या भयकारी ज्वालांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. तरीही साडेतीन तासांच्या अथक झुंजीनंतर मध्यरात्री १ वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं. या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील ४४८ दुकाने जळून खाक झाली.

 

आगीचे कारण अस्पष्ट

या दोन्ही ठिकाणी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

वरळी आगीच्या ठिकाणाला महापौरांची भेट

प्रभादेवी येथे आग लागलेल्या गॅमन हाऊसला महापोर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. तेथे त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आगीशी अथक झुंज देणारे अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक मुंबई पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. अग्निशमन पथकाचे कौतुकही केले.

fire


Tags: mumbaiprabhadeviआगीचे तांडवपुणेमुंबई
Previous Post

मस्त झोपा…निरोगी आणि खूप जगा!

Next Post

“मोदी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी”  – नसीम खान

Next Post
Naseem Khan agitation

"मोदी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी"  - नसीम खान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!