मुक्तपीठ टीम
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपावर केला केला आहे. याच पार्श्वभूमीवर आप’ने पंजाबच्या पोलिस महासंचालकांकडे (डीजीपी) तक्रार दाखल केली आहे. यावेळी आपने भाजपा आपल्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल
- राज्यातील काही आमदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १७१-ब आणि १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला.
- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने असा दावा केला आहे की, भाजपा पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि पक्षाच्या १० आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भाजपावर आरोप केले!!
- पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपाने आपल्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला.
- पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरोप केला की, भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग म्हणून राज्यातील काही ‘आप’ आमदारांशी संपर्क साधण्यात आला होता.
- ‘आप’च्या वरिष्ठ नेत्याने दावा केला की, ‘आप’च्या सात ते दहा आमदारांना पैसे आणि मंत्रिपदाच्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
- चीमा म्हणाले की, पंजाबमधील आमच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे.
- आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले काही भाजपा लोक त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत.