Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बनावट पावत्या वापरून २१ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस!

नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने पकडले रॅकेट

February 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Navi mumbai CGST

मुक्तपीठ टीम

नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने सुमारे २१ कोटी रुपये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे आणि मेसर्स श्री राम एंटरप्राइज (GSTIN: 27FPAPS4153A1Z3) च्या मालकाला आज अटक केली. ही कंपनी सुमारे १०० कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसवर फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, वापरणे आणि दुसऱ्याला देण्याचे व्यवहार करत होती.

 

सीजीएसटी नवी मुंबईच्या कर चुकवेगिरी विरोधी पथकाने या कंपनीची चौकशी केली. मालकाने दिलेल्या जबाबानुसार, ही कंपनी विविध धातूंच्या भंगाराच्या व्यापारात सहभागी आहे. तपासात असे आढळून आले की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट आयटीसीचा लाभ घेतला आणि दुसऱ्याला हस्तांतरित केला. आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा, २०१७ च्या कलम ६९ (१) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३२(१) (b) आणि (c) नुसार गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्याला बेलापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर १६-०२-२२ रोजी हजर करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

हे प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग आहे जे नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी स्पर्धा निर्माण करतात आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करतात. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने अलिकडेच सुमारे ५०० कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली, २० कोटी रुपये जप्त केले आणि १३ जणांना अटक केली.

 

सीजीएसटी विभाग कर चुकवणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, सीजीएसटी मुंबई विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या पाच महिन्यांत ६२५ हून अधिक कर चुकवेगिरीचे गुन्हे नोंदवले असून ५५०० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधून काढली आहे, तर ६३० कोटी रुपये वसूल केले असून 50हून अधिक लोकांना अटक केली आहे.

 

फसवणूक आणि करचोरी करून सरकारला फसवणाऱ्यांविरोधात सीजीएसटी विभागमोहीम अधिक तीव्र करणार आहे.


Tags: Navi Mumbai CGSTइनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळानवी मुंबई सीजीएसटीश्री राम एंटरप्राइज
Previous Post

आघाडीच्या एजेंसीही कामाला लागल्या? जलयुक्त शिवार घोटाळ्यातले ३ निवृत्त अधिकारी गजाआड!

Next Post

मुंबईत तांदुळ महोत्सव! वाडा कोलम, इंद्रायणी, घनसाळ, रंगीत असे ४० वाणांचे तांदूळ!

Next Post
Ajit pawar inaugrated mumbai rice festival 2

मुंबईत तांदुळ महोत्सव! वाडा कोलम, इंद्रायणी, घनसाळ, रंगीत असे ४० वाणांचे तांदूळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!