Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीच्या एजेंसीही कामाला लागल्या? जलयुक्त शिवार घोटाळ्यातले ३ निवृत्त अधिकारी गजाआड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Parli Police Station

मुक्तपीठ टीम

केंद्रातलं सरकार यंत्रणांना कमाला लावत असल्याचा आऱोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जात आहे. मात्र आता राज्यातलं आघाडीचं सरकारही आपल्या अखत्यारीतल्या यंत्रणांचा वापर करुन घेत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांपासून फरार निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई केली आहे. जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात २०१७ मध्ये परळी पोलीस स्टेशन मध्ये २ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

 

परळी पोलिसांनी सुनील गीते (वय ५८), उल्हास भारती (वय ६४), त्र्यंबक नागरगोजे (वय ६४) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान या तिन्ही निवृत्त अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली असून त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना ९० लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशा सोबतच पोलिसांनीसुद्धा अटकेची कारवाई सुरू केली आहे.

 

१५ टक्के कामांमध्ये ९० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश…

  • दरम्यान, जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली होती.
  • या पथकाने १५ टक्के कामाची निवड तपासणीसाठी केली होती.
  • तसेच एकूण ८१५ कामांपैकी १२३ कामे निवडण्यात आली होती.
  • त्यापैकी १०३ कामांची तपासणी झाली ज्यात ९५ कामांमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले होते.
  • त्यानंतर या कामांमध्ये नव्वद लाख रुपयाच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांन नोटीस देण्यात आली आहे.
  • बीड जिल्ह्यातील एकूण ६२ कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्‍यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे.
  • तथापि, केवळ १५ टक्के कामांमध्ये ९० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आले.
  • सर्वच कामांची तपासणी केल्यावर घोटाळ्याच्या रकमेचा तर आकडा वाढेलच, पण वसूल पात्र रकमेतही मोठी भर पडू शकते .

Tags: Parliजलयुक्त शिवारातील घोटाळापरळी
Previous Post

“अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड” : नाना पटोले

Next Post

बनावट पावत्या वापरून २१ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस!

Next Post
Navi mumbai CGST

बनावट पावत्या वापरून २१ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!