Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत तांदुळ महोत्सव! वाडा कोलम, इंद्रायणी, घनसाळ, रंगीत असे ४० वाणांचे तांदूळ!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ajit pawar inaugrated mumbai rice festival 2

मुक्तपीठ टीम

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि ग्रोव्हर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले.

Ajit Pawar Inaugurated Rice Festival in Mumbaiयावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ajit pawar inaugrated mumbai rice festival 1
दिनांक १७, १८, १९ फेब्रुवारी या तीन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ यादरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे तांदूळ प्रदर्शन व विक्री होणार आहे. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्ध पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन केले. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन तांदूळ वाणाची माहिती, तांदूळ कसा व किती रुपयांनी विक्री करणार आहात याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली.

 

या महोत्सवामुळे राज्यभरातील तांदूळ थेट शहरी उपभोक्त्यांना खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी दिली.

Ajit pawar inaugrated mumbai rice festival 3

यावेळी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संस्थांमार्फत वेगवेगळ्या वाणांचे सुमारे ४० प्रकारचे तांदूळ येथे आणले गेले आहेत. ठाणे व पालघरचा वाडा कोलम, मावळ व मुळशीचा इंद्रायणी आणि आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ, चंद्रपूर व विदर्भातील श्रीराम कोलम, अकोले व नाशिक येथील आदिवासी उत्पादित ब्लॅक, रेड, ब्राउन राईस इत्यादी पारंपरिक तसेच संशोधित तांदळाच्या वाणांची उपलब्धता याठिकाणी आहे. विविध प्रकारच्या तांदूळ वाणांबद्दल जागरूकता निर्माण होऊन आणि या वाणांची मागणी उत्तरोत्तर वाढून त्याचा दिर्घकालीन लाभ तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना होईल असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

 

राज्यभरातील तांदूळ व धान उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ थेटपणे उपलब्ध व्हावी आणि शहरी नागरिकांना विविध प्रकारच्या तांदळाच्या खात्रीशीर वाणांची एकाच ठिकाणी किफायतशीर किमतीत वर्षभराच्या तांदळाची एकदम खरेदी करता यावी या व्यापक उद्देशातून हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


Tags: ajit pawarmaharashtra rice festivalsupriya suleग्रोव्हर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेडमहाराष्ट्र तांदूळ महोत्सव
Previous Post

बनावट पावत्या वापरून २१ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस!

Next Post

सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी

Next Post
Shankarrao Gadakh instruction on Water conservation works in Sindhudurg and Ratnagiri

सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!