मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेबाबत एक खोटी बातमी व्हायरल होत आहे. त्याबातमीत असा दावा केला जात आहे की रेल्वेने लकी ड्रॉ काढला आहे, ज्यामध्ये ६००० रुपये जिंकण्याची संधी आहे. जर अशी कोणतीही बातमी तुम्ही वाचली असेल किंवा तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला असेल तर ती बातमी खोटी आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करत ही बातमी खोटी असल्याचं उघड केलं आहे.
व्हायरल मेसेजमध्ये दावा काय?
- भारतीय रेल्वे लोकांना ६००० रुपये जिंकण्याची संधी देत आहे.
- मेसेजमध्ये असा प्रश्नही विचारण्यात आला आहे की, भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना वाहतूक अनुदानाची सुविधा दिली जात आहे का?
- प्रश्नाचे उत्तर देऊन ६००० रुपयांची लॉटरी जिंकण्याची संधी.
काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य?
- भारतीय रेल्वेबाबतचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने मेसेजची चौकशी केली.
- पीआयबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हायरल झालेला फोटो शेअर केला आणि सांगितले की, तो खोटा मेसेज आहे.
- भारतीय रेल्वेकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही.
- पीआयबीने लोकांना या खोट्या लॉटरीचा मेसेज कोणालाही पाठवू नये असे आवाहन केले आहे.
A #FAKE lucky draw in the name of @RailMinIndia
is viral on social media and is offering a chance to win ₹6,000 after seeking one's personal details #PIBFactCheck▶️ It's a scam & is not related to Indian Railways
▶️ Please refrain from sharing this fake lottery message pic.twitter.com/VJ0nrrtcnk
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 31, 2022