Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा – डॉ. अनिल बोंडे

November 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Anil Bonde

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे  राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.

डॉ. बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारने अलीकडेच सोयाबीन आणि तेलबियांच्या साठ्यावरील निर्बंध हटविले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत असले तरी देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे दर तुलनेने कमीच आहेत. खाद्यतेलाच्या दरातील वाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी तेलबियांच्या आणि सोयाबीनच्या साठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेऊन साठा मर्यादा किती असावी याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले होते. मात्र राज्यांनी साठा मर्यादा न ठरविल्यामुळे केंद्र सरकारने मर्यादा ठरवून डिसेंबर २०२२ पर्यंत हे निर्बंध राहतील असे जाहीर केले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. मात्र देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्याने तसेच साठा मर्यादा, वायदेबंदीमुळे दर कमीच आहेत. केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध काढून टाकल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणखी एक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा मोदी सरकारचे अभिनंदन करीत आहे, असे डॉ. बोंडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.


Previous Post

“भारतीय रेल्वेच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या, सहा हजार मिळवा!” जाणून घ्या फेक की फॅक्ट?

Next Post

निवडणूक आता जाहीर, पण गुजरातचा निकालही हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला!

Next Post
Gujarat Elelction

निवडणूक आता जाहीर, पण गुजरातचा निकालही हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!