Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बनावट नोटांचा काळा धंदा! मोठ्या नोटांचं प्रमाण जास्त, पण एक रुपयाच्याही बनावट नोटा!!

February 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
fake currancy

मुक्तपीठ टीम

देशात नोटाबंदीला पाच वर्ष झाली असली तरी बनावट नोटाचा काळा धंदा सुरुच आहे. पाचशे आणि दोन हजार नोटांपासून अगदी एक रुपयाच्या नोटांचीही नक्कल केली जात असल्याचं उघड झालं आहे. नोटाबंदीनंतरच्या पाच वर्षांत एक रुपयाच्या ६०७२ बनावट नोटा पकडल्या गेल्याचा अहवाल एनसीआरबीने दिला आहे. एक रुपया, पाचशे आणि दोन हजारच्या खऱ्या नोटांसारख्या हुबेहुब बनावट नोटा बाजारात चलनात आल्या आहेत.

 

लहान चलन, कमी नक्कल! अपवाद एक रुपयाचा…

  • गेल्या दोन वर्षात २, ५ आणि १० रुपयांची एकही बनावट नोट पकडली गेली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
  • छोट्या नोटांची नक्कल करण्यात खर्च आणि २००० च्या बनावट नोटा छापण्याइतकेच धोके आहेत. विनाकारण कमी फायद्यात अडकू नये म्हणून फसवणूक करणारे लहान नोटा बनावट बनवत नाहीत.
  • नोटाबंदीनंतरच्या पाच वर्षांत एक रुपयाच्या ६०७२ बनावट नोटा पकडल्या गेल्याचा अहवाल एनसीआरबीने दिला आहे.
  • त्यामुळेच एक रुपयाच्या बनावट नोटा सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
  • पाच वर्षांत दोन हजारांच्या ४६७३४६, एक हजाराच्या ५२२३८१ आणि ५००च्या २९७३७२ नोटा जप्त करण्यात आल्या.

कोणाची नक्कल, कोणाची नाही?

  • दुसरीकडे या काळात दोन रुपयांची एकही नोट पकडली गेली नाही.
  • दोन रुपयांची नोट अजूनही चलनात आहे, पण बाजारात एकही बनावट नोट नाही.
  • मात्र, दोन हजार आणि पाचशेच्या बनावट नोटांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.
  • सपाचे राज्यसभा खासदार छ. सुखराम सिंह यादव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्र्यांनी ही माहिती राज्यसभेत दिली आहे.
  • एनसीआरबी अहवालानुसार २०१६ ते २०२० दरम्यान २०१७४२७ बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत.
  • एवढेच नाही तर बंद झालेल्या एक हजाराच्या बनावट नोटा सापडत आहेत.
  • २०१६ मध्ये ८२ हजार ४९४ बनावट नोटा सापडल्या होत्या आणि २०२० मध्ये ही संख्या ३१८१४३ झाली.
  • कमी-अधिक प्रमाणात तीच स्थिती दोन हजाराच्या नोटांच्या बाबतीत राहिली.
  • नोटाबंदीनंतर २०१६ मध्ये चलनात आलेल्या दोन हजाराच्या २ हजार २७२ बनावट नोटा पकडल्या गेल्या, त्यानंतर २०२० मध्ये ही संख्या २ लाख ४४ हजार ८३४ वर पोहोचली.

५० रुपयांच्या बनावट नोटा

  • २०१६ मध्ये चलनात आलेल्या ५००,२०० आणि ५० रुपयांचे एकही नवीन चलन पकडले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  • ५०० आणि ५० रुपयांच्या जुन्या बनावट नोटा मिळवण्याचा क्रम सुरूच होता.
  • ५० रुपयांच्या जुन्या बनावट चलनाचा वेग थांबल्यानंतर याच्या नव्या चलनाची नक्कल करण्याच्या प्रकाराला वेग आला.
  • २०१६ मध्ये ५० रुपयांच्या ३१३७ जुन्या नोटा पकडल्या गेल्या, त्यानंतर २०२० मध्ये ही संख्या १५८९ राहिली.
  • २०१६ मध्ये, ५० रुपयांचे नवीन चलन एकही बनावट नव्हते, तर २०२० मध्ये ही संख्या ८५९९ वर पोहोचली.

Tags: 200 Rupees२००० रुपये५०० रुपयेFake CurrancyIndiaएक रुपयाबनावट नोटाभारत
Previous Post

गाडीवर गोळीबारानंतर एमआयएमच्या ओवेसींना झेड सुरक्षा! २२ पोलीस तैनात!

Next Post

महिला धोरणाच्या मसुद्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post
yashoamti Thakur

महिला धोरणाच्या मसुद्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा - महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!