Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला धोरणाच्या मसुद्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

February 4, 2022
in सरकारी बातम्या
0
yashoamti Thakur

मुक्तपीठ टीम

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करून ते राबवावयाचे आहे. याबाबत विविध घटकांसमवेत बैठका घेण्यात येत असून अभिप्राय मागविण्यात येत आहे. आज विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महिला धोरणाच्या प्रारूप मसुद्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.

       

सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

       

या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.

       

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिला धोरणामध्ये अधिक बाबी समाविष्ट करणे आवश्यक वाटते, त्या तात्काळ कळवाव्या. या धोरणाचा प्रारूप मसूदा पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात अभ्यास करण्यात यावा.

            

आपल्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात विशाखा समिती गठित करण्यासंदर्भात आढावा घ्यावा. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी कृषी विद्यापीठांनी सहकार्य करावे. तसेच महिलांना शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळाली पाहिजे. अनेक विद्यापीठात महिलांसाठी कौशल्य विषयक अभ्यासक्रम असतात, त्याची माहिती त्यांना होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

       

यावेळी कृषी विद्यापीठे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई,नागपूर,औरंगाबाद, बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा या विद्यापीठांचे कुलगुरु दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


Tags: Adv. yashomati thakurEconomic Development Corporationआर्थिक विकास महामंडळमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

बनावट नोटांचा काळा धंदा! मोठ्या नोटांचं प्रमाण जास्त, पण एक रुपयाच्याही बनावट नोटा!!

Next Post

केंद्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची कामगिरी! देशातील स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये महाराष्ट्र प्रथम!

Next Post
Maharashtra first in startup ecosystem of the country

केंद्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची कामगिरी! देशातील स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये महाराष्ट्र प्रथम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!