Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयकर रिटर्नसाठी आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
income tax

मुक्तपीठ टीम

भारतातील कोट्यवधी करदात्यांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी अजून २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यांचे आयकर रिटर्न ई-सत्यापित केले नाही ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आयकर विभागाने करदात्यांना दिलासा देत पडताळणीची मुदत वाढवली आहे.

 

आयकर कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरीशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार कार्डचे ओटीपी, नेटबँकिंग, डीमॅट खात्याद्वारे पाठवलेला कोड, पूर्व-प्रमाणित बँक खाते किंवा एटीएम यांची पडताळणी आवश्यक आहे. ही पडताळणी आयकर रिटर्न भरल्यानंतर १२० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.

 

त्याचप्रमाणे, आयकर करदाता आयटीआरची एक भौतिक प्रत बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर म्हणजेच सीपीसी कार्यालयात पाठवून देखील सत्यापित करू शकतात. जर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर रिटर्न भरले गेले नाही असे मानले जाते.

 

२०२०-२१ आयकर रिटर्नसाठी ५ कोटींपेक्षा जास्त आयटीआर दाखल

  • आयकर विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत ५ कोटींहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत.
  • वैयक्तिक करदात्यांच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत विभागाने आधीच पाच महिन्यांनी वाढवली आहे.
  • आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, २९ डिसेंबरला संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत पाच कोटींहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत.
  • रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना आयटीआरची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

गेल्या वर्षी ५.९५ कोटी आयटीआर दाखल

  • २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी, ५.९५ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.
  • यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती.
  • प्राप्तिकर विभागाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर सादर केलेल्या करदात्यांना दिलासा देत असे म्हटले आहे की, जे करदाते रिटर्नची ई-पडताळणी करत नाहीत ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करू शकतात.

Tags: extensiongood newsincome taxincome tax returnIndiaitrmuktpeethआयकर रिटर्नआयकर विभागआयटीआरगुड न्यूजप्राप्तिकर विभागभारतमुक्तपीठमुदतवाढ
Previous Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवण्याची मागणी

Next Post

वर्ष सरतानाही संकटं सरली नाहीत…अवकाळी पाऊस, गारपिटीचा शेतकऱ्यांना तडाखा!

Next Post
jalna rainfall

वर्ष सरतानाही संकटं सरली नाहीत...अवकाळी पाऊस, गारपिटीचा शेतकऱ्यांना तडाखा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!