Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्ष सरतानाही संकटं सरली नाहीत…अवकाळी पाऊस, गारपिटीचा शेतकऱ्यांना तडाखा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jalna rainfall

मुक्तपीठ टीम

अतिवृष्टी, पूर, वादळ…त्यानंतर अवकाळी पावसांचा वारंवार बसणारा फटका. वर्ष सरायला आलेलं असतानाही शेतीवर आलेल्या संकटांची मालिका काही सरलेली नाही. एकीकडे कडाक्याची थंडी पडलेली असताना मराठवाडा, विदर्भाला आणि राज्यातील इतरही अनेक ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्याच्या काही भागात पावसाने अवेळी हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

 

जालना

  • जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.
  • अंबड आणि भोकरदन तालुक्यात वादळी पावसासह गारपीट झाली.
  • अंबड तालुक्यातील दूनगाव,बारसवाडा, सिरसगाव येथे जोरदार पाऊस आणि गारा बरसल्या.
  • भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे गारा आणि वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
  • मका,गहू, ज्वारी,हरभरा या सह फळपिकांच मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
  • जाफराबाद तालुक्यातही पावसाचा जोर होता.
  • तीर्थपुरी गावाच्या परिसरातही अवकाळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारा पडल्या.
  • जालना शहर तालुक्यासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.

 

औरंगाबाद

  • जिल्ह्यातील पैठण, पाचोड, गंगापूर, वैजापूर आदी परिसरात वादळी वारा, पाऊस आणि कुठे कुठे तर गारपीटीनेच झोडपलं. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं.
  • पैठण तालुक्यातील इसारवाडी, धनगाव, वाहेगव, लोहगावमध्ये वादळी वाऱ्यासह १५ ते २० मिनिटे जोरदार गारपीट झाली.
  • या भागात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.
  • गंगापूर शहर आणि परिसरात, तसेच वैजापूरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
  • त्यामुळे नव्याने लागवड होत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले.
  • हरभरा, ज्वारीसह रबीच्या पिकांनाही फटका बसला.

 

पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह २० मिनिटे गारपीट झाली. गंगापूरलाही याचा तडाखा बसला.
वैजापूर तालुक्यात गंगथडी पिकांसह मेंढपाळही गारपिटीत झोडपून निघाले. द्राक्षांच्या फळबागांना तडाखा बसला, कोवळ्या कांद्यांचे रोप खराब झाले.

 

अकोला

  • अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पश्चिम वऱ्हाडात रब्बी हंगामातही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
  • काही ठिकाणी हाती आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे.
  • काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
  • हरभरा, गहू, कांदा व भाजीपाला या पिकांचे देखील नुकसान झाले.
  • रब्बी हंगामातील पिके, फळबागा आदींना गारपिटीचा जबर मार लागला.
  • विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेला मालदेखील पावसाच्या पाण्याने भिजला.
  • अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान केल्याने शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटाने भरडला गेला आहे.

 

नागपूर

  • जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड तालुक्यात गारांसह पाऊस झाला. मोहपा, वाढोना व मेंढला परिसरात गारपीट झाली.

 

यवतमाळ

  • जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती आणि जवळपासच्या तालुक्यात गारा पडल्या.
  • जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे सुटले. त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.
  • बाभुळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, बाभुळगाव, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापुर, नागरगाव, पंचगव्हाण, चिमणापूर, पिंपरी(इजारा), इंदिरानगर, नांदुरा खुर्द, मालापुर या गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला.
  • नेर तालुक्यातील चिखली (कान्होबा) पिंपरी, कलगाव आणि कळंब तालुक्यातील सावरगाव ताले गाव पिंपळखुटी या गावांमध्येही जोरदार अवकाळी पाऊस पडला.
  • या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा व तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले.

 

हिंगोली

  • गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
  • अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून गारपीटीच्या धास्तीने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.

 

अहमदनगर

  • श्रीरामपूर तालुक्यात गोदाकाठी पूर्व परिसरातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला. यामुळे पिकांचे नुकसान झाले. पावसासोबत गाराही पडू लागल्या.

Previous Post

आयकर रिटर्नसाठी आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ!

Next Post

भाजपाची भन्नाट कल्पना, आघाडीच्या मंत्र्यांना घोटाळेरत्न, घोटाळेवैभव, घोटाळेभूषण, घोटाळेसम्राट पुरस्कार देणार!

Next Post
BJP to honor MVA govt On various Scam

भाजपाची भन्नाट कल्पना, आघाडीच्या मंत्र्यांना घोटाळेरत्न, घोटाळेवैभव, घोटाळेभूषण, घोटाळेसम्राट पुरस्कार देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!