Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवण्याची मागणी

"राज्यपाल कोश्यारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?" - नसीम खान

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
naseem khan and koshyari

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संविधानिक पदावर असूनही एका राजकीय पक्षाचे नेते असल्यासारखे वागत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात राजभवनच्या माध्यमातून सातत्याने अडथळे आणले जात आहेत. लोकनियुक्त सरकार व राजभवन यांच्यात सुसंवाद दिसत नाही त्यामुळे केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलवावे, अशी मागणी माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजभवनने विनाकारण पेच निर्माण करुन ही निवडणूक पार पडू दिली नाही. सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया पार पाडत राज्यपाल यांना अवगत केले होते तरीही राजभवनकडून विनाकरण कायदेशीर सबबी पुढे करण्यात आल्या. ११ महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त आहे, सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची भूमिका घेतली होती तरीही राजभवनने प्रतिष्ठेचा मुद्दा पुढे केल्याने निवडणूक होऊ शकली नाही. सरकारच्यावतीने मा. राज्यपाल यांचा योग्य तो सन्मान राखला जात आहे तरिही राजभवनकडून मात्र सरकारला सहकार्य केले जात नसल्याचे दिसत आहे.

 

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरही राजभवनकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. राज्य सरकारने १२ सदस्यांच्या नावांची शिफारस करून एक वर्ष उलटून गेले तरीही त्यावर राजभवनकडून निर्णय घेतला जात नाही. विरोधी पक्ष भाजपाकडून प्रत्येक घटनेत राजभवनचा वापर केला जात असून मा. राज्यपाल त्यांच्या राजकीय खेळीला बळी पडत आहेत. राजभवनकडून समांतर सरकार चालवले जात असल्याचेही दिसत आहे. राज्यपालपद हे संविधानिक पद असून त्या पदाची मर्यादा त्यांनी राखली पाहिजे. राज्यपाल त्यांच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, तर त्यांना या जबाबदारीतून केंद्राने मुक्त करावे, असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.


Tags: Congressnaseem khanकाँग्रेसनसीम खानराज्यपाल भगत सिंह कोश्यारी
Previous Post

जळगावातील अस्वस्थ नातेसंबंध, मैत्रीपूर्ण वाद आणि नवं रक्तचरित्रम!

Next Post

आयकर रिटर्नसाठी आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ!

Next Post
income tax

आयकर रिटर्नसाठी आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!