Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतीसाठी ड्रोन वापरण्यासाठी सरकारचे प्रोत्साहन, ड्रोन खरेदीसाठी संस्थांना १० लाखांपर्यंत अनुदान!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Agricultural drones

मुक्तपीठ टीम

भारतात सुयोग्य पद्धतीने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी ड्रोन तंत्रज्ञान किफायतशीर बनवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘कृषी यांत्रिकीकरणावरील सब-मिशन’च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोन खरेदीसाठी कृषी ड्रोनच्या किमतीच्या १००% किंवा १० लाख रुपये, यापैकी जे कमी असेल ते अनुदान स्वरूपात दिले जाईल. कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि चाचणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठे यांच्या द्वारे हे अनुदान दिले जाईल.

 

शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) कृषी ड्रोनच्या किंमतीच्या ७५% पर्यंत अनुदान मिळवण्यास पात्र असतील. याचबरोबर ड्रोन भाड्याने घेण्यासाठीही अनुदान मिळणार आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमधील बातमीची लिंक क्लिक करून मुक्तपीठ वेबसाइटवर तपासा.

 

ड्रोन खरेदी करू न इच्छिणाऱ्या परंतु कस्टम हायरिंग सेंटर, हाय-टेक हब, ड्रोन उत्पादक आणि स्टार्ट-अप यांच्याकडून प्रात्यक्षिकांसाठी ड्रोन भाड्याने घेणाऱ्या अंमलबजावणी संस्थांना प्रति हेक्टर ६ हजार रुपये आकस्मिकता खर्च दिला जाईल. ड्रोन प्रात्यक्षिकांसाठी ड्रोन खरेदी करणाऱ्या अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचा आकस्मिकता खर्च प्रति हेक्टर ३ हजार रुपये पर्यंत मर्यादित असेल. वित्तीय सहाय्य आणि अनुदान ३१ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

 

ड्रोन ऍप्लिकेशनद्वारे कृषी सेवा प्रदान करण्यासाठी, ड्रोन आणि त्याच्या ऍटॅचमेंटच्या मूळ किमतीच्या ४०% किंवा ४ लाख रुपये, यापैकी जे कमी असेल ते शेतकरी सहकारी संस्था. एफपीओ आणि ग्रामीण उद्योजकांनी स्थापन केलेल्या विद्यमान कस्टम हायरिंग सेंटर्सना ड्रोन खरेदीसाठी वित्तीय सहाय्य म्हणून उपलब्ध असेल. शेतकरी सहकारी संस्था. एफपीओ आणि ग्रामीण उद्योजकानी स्थापन केलेले नवीन कस्टम हायरिंग सेंटर्स किंवा हाय-टेक हब ‘कृषी यांत्रिकीकरणावरील सब-मिशन’ (SMAM), राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) किंवा इतर कोणत्याही योजनांमधून आर्थिक साहाय्य घेऊन त्यांच्या प्रकल्पांमध्ये इतर कृषी यंत्रांसह ड्रोनचा देखील एक यंत्र म्हणून समावेश करू शकतात.

 

कस्टम हायरिंग सेंटर्सची स्थापना करणारे कृषी पदवीधर ड्रोन खरेदीसाठी ड्रोन आणि त्याच्या ऍटॅचमेंटच्या मूळ किमतीच्या ५०% किंवा ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान सहाय्य मिळवण्यास पात्र असतील. ग्रामीण उद्योजकांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी; आणि त्याच्याकडे नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) किंवा कोणत्याही अधिकृत दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्थेद्वारे निर्दिष्ट संस्थेचा दूरस्थ पायलट परवाना असावा.

 

ड्रोन ऍप्लिकेशनच्या वापरासंबंधी मानक कार्यप्रणाली साठी येथे क्लिक करा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Agricultural dronesFPOsgood newsIndiamuktpeethUnion Ministry of Agriculture and Farmers Welfareकृषी ड्रोनकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमरचांगल्या बातम्याभारतमुक्तपीठशेतकरी उत्पादक संघटना
Previous Post

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेनेला नवी दिशा! उगाच बेंडकुळ्या फुगवू नका, गावागावात संस्थात्मक काम उभं करा!

Next Post

सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण, भारतात १३ हजार फूट उंचीवर जगातील सर्वात लांब बोगदा

Next Post
Sela tunnel project

सेला बोगदा प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण, भारतात १३ हजार फूट उंचीवर जगातील सर्वात लांब बोगदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!