Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?

September 6, 2026
in आरोग्य
0
heart hole

मुक्तपीठ टीम

१०० पैकी एका मुलाला हृदयविकार असतो. लहान मुलांच्या ह्रदयामध्ये असलेल्या छिद्रामुळे त्यांचा जीव धोक्यात येवू शकतो.यामुळे त्याचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे.जर उपचार वेळेत न केल्यास दोष वाढू शकतात. यासाठी लोकांना जागृतही केले जाते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात स्वांतंत्र्यदिनी शिवसेनेनं आयोजित केलेलं शिबिर अशा मुलांसाठी जीवनरेखा वाढविणारी मोठा मदतीचा हातच आहे. त्यानिमित्तानं हा विकार पुन्हा चर्चेत आला आहे. त्यासाठीच हा विकार नेमका आहे काय, त्याची लक्षणे आणि त्यावरील शस्त्रक्रियांबद्दलची इंटरनेटवरून जमवलेली माहिती मांडण्याचा हा प्रयत्न:

 

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय?

  • लहान मुलांमध्ये सर्वाधिक एएसडी,व्हीएसडी आणि पीडीए यांचे प्रमाण आढळून येते.
  • याला हृदयातील छिद्र असे म्हणतात.
  • आपल्या हृदयात चार कप्पे असतात.
  • पहिल्या दोन कप्प्यांना atrium असे म्हणतात,
  • दुसऱ्या दोन कप्प्यांना ventricles असे म्हणतात.
  • हृदयातून दोन मोठ्या रक्तवाहिन्या शरीराला अथवा फुफ्फुसाला रक्त पोहोचवतात.
  • दोन्ही atrium मध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना atrial septal defect (एएसडी) असे म्हणतात.
  • दोन्ही व्हेन्ट्रिकल्समध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना ventricular septal defect (व्हीएसडी) असे म्हणतात.
  • हृदयामधून निघणाऱ्या दोन्ही रक्तवाहिन्यांना जोडणारी एक रक्तवाहिनी असते.
  • ही रक्तवाहिनी आईच्या पोटात असताना प्रत्येक अर्भकामध्ये असते, पण जन्म झाल्यानंतर ती बंद होते.
  • ती बंद न झाल्यास उद्भवणाऱ्या आजाराला patent ductus arteriosus असे म्हणतात.

 

हेही वाचा: हृदयाला छिद्र असलेल्या मुलांना स्वातंत्र्यदिनी व्याधीपासून स्वातंत्र्य

 

ह्रदयाला छिद्र असण्याच्या विकाराची लक्षणे

  • धाप लागणे
  • वेगाने
  • थकवा वाटणे
  • घाम येणे
  • वजन न वाढणे
  • छातीत दुखणे
  • न्यूमोनिया होण्याची भीती असते.
  • भूक न लागणे
  • अंग निळं पडणे

 

ह्रदयाला छिद्राच्या विकारावर कशी होते शस्त्रक्रिया?

  • हृदयातील कोणतेही छिद्र औषधांनी बुजू शकत नाही.
  • हृदयात छिद्रे असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया झाल्याशिवाय त्यांचे वजन वाढणारच नाही.
  • अल्ट्रासाऊंड स्कॅनने गर्भामधील जन्मजात हृदय दोष शोधण्यात मदत होते.
  • यामध्ये दोन प्रकारची उपचार पद्धती आहे.
  • प्रथम हार्ट सर्जरी किंवा डिव्‍हाइस प्रोसिजर या बालकांमध्ये करण्यात येऊ शकते.
  • आपल्या छातीच्या समोर sternum नावाचे एक हाड असते.
  • sternum हाड उघडून हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात येते.
  • या शस्त्रक्रियेला ओपन हार्ट सर्जरी असे म्हणतात.
  • एएसडी आणि व्हीएसडी बंद करण्यासाठी प्रामुख्याने ही पद्धत अवलंबली जाते.
  • या शस्त्रक्रियेसाठी Heart-Lung मशिन वापरण्यात येते.
  • हृदय बंद न करता जी शस्त्रक्रिया करण्यात येते, तिला क्लोज्ड हार्ट सर्जरी असे म्हणतात.
  • या तीन आजारांमध्ये कधीकधी डिव्हाइस प्रोसिजरही शक्य होऊ शकते.
  • या डिव्हाइस प्रोसिजरमध्ये जांघेमधून एक कॅथेटर हृदयाच्या आतपर्यंत पोहोचविण्यात येते.
  • व त्या कॅथेटरमार्फत एक छत्रीवजा डिव्हाइसने एएसडी, व्हीएसडी अथवा पीडीए बंद करण्यात येते.
  • या डिव्हाइस प्रोसिजरसाठी कॅथ लॅब नावाच्या यंत्रणेची गरज पडते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: atriumhealthHeart-Lung मशिनShivsenaventricular septal defectव्हीएसडीशिवसेनाह्रदयाला छिद्र
Previous Post

हृदयाला छिद्र असलेल्या मुलांना स्वातंत्र्यदिनी व्याधीपासून स्वातंत्र्य

Next Post

लष्करातील गिर्यारोहक सियाचेनमधील ५ अस्पर्शित हिमशिखरे सर करणार

Next Post
army mountaineers

लष्करातील गिर्यारोहक सियाचेनमधील ५ अस्पर्शित हिमशिखरे सर करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!