Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन देखरेखीसाठी पर्यावरणीय मूल्यमापन संस्था

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

February 5, 2022
in सरकारी बातम्या
0
Powai Lake

मुक्तपीठ टीम

पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन करताना विविध कामे महानगरपालिकेच्या वतीने होणार आहेत. या कामांची अंमलबजावणी करताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने महानगरपालिकेच्या वतीने पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार असून त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाच्या भौतिक व नैसर्गिक वातावरणाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पर्यावरणीय पैलूंवर देखरेख करण्यासाठी आणि पवई तलावाच्या काठाची जैवविविधता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची एक देखरेख समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. मगरी व जलचर यांसारख्या सरपटणाऱया प्राण्यांचे अभ्यासक तज्ञ, वन्यजीवशास्त्रज्ञ केदार भिडे यांची देखील त्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तलावातील जलचर विषयक परिस्थिती सुधारणे, पवई तलावातील नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणणे, तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे इत्यादीबाबत मार्गदर्शन आणि शिफारशी करण्यासाठी केदार भिडे यांची नियुक्ती केलेली आहे.

 

 

यासोबतच आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात तज्ज्ञ सल्लागार समितीने सुचविलेल्या विविध संदर्भित अटींचा समावेश असेल. पवई तलाव संदर्भात विविध संस्थांनी यापूर्वी अभ्यास करुन बनविलेले अहवाल आणि संशोधन संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीला सहाय्य करणे, तलाव आणि परिसराशी संबंधित पर्यावरणीय घटकांचे नमुने घेणे, तलावाच्या तळाशी असलेली जैवस्थिती, सरपटणारे प्राणी व जलचर आणि इतर जैवविविधता यांची आधाररेषा निश्चित करणे, मानवरहित विमान प्रणालीद्वारे तलाव आणि त्याच्या सभोवतालचे सीमांकन (मॅपिंग) ठरवणे, उच्च दर्जाच्या छायाचित्र भूमिती प्रतिमा तयार करणे, पवई तलावाच्या सद्यस्थितीतील पर्यावरणीय गुणवत्तेचे मूल्यमापन करणे आणि सरोवरशास्त्राच्या नजरेतून बाबी निश्चिती करणे, उपलब्ध माहितीआधारे पवई तलावाची सरोवरशास्त्रीय पद्धतीने माहिती तयार करणे आणि नवीन अभ्यास करुन ती अद्ययावत करणे, जलवैज्ञानिकदृष्ट्या तलावावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे, तलाव संरक्षण आणि पुनरुज्जीवन कामांसाठी संशोधन सहाय्य प्रदान करणे, तलाव आणि परिसरात मानव आणि प्राणी दरम्यान संघर्ष रोखण्यासाठी योजना तयार करणे, तलाव परिसरात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणपूरक संकल्पना सुचविणे, तलावातील मगरी व इतर प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, स्थलीय आणि जलीय जैवविविधतेचे मूल्यांकन करणे, तलाव पुनरुज्जीवनासाठीचे पर्याय तयार करणे आणि त्याचा तलाव व परिसरातील पर्यावरणीय गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासणे, बाष्पीभवनाच्या नुकसानाचे मूल्यमापन करणे आणि इतर जलस्रोतांशी त्याचा संबंध पडताळून पाहणे, बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा पवई तलाव सल्लागार समिती यांनी सुचविलेली इतर कोणतेही कामे इत्यादी जबाबदारी या संस्थेकडे सोपविण्यात येईल.


Tags: Greater Mumbai Municipal CorporationPowai Lakeपवई तलावबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई
Previous Post

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० दिवसांत नुकसानभरपाईचे आदेश

Next Post

पत्रकार नंदू धुरंधर दिग्दर्शित ‘गामा फाउंडेशन फिल्म्स’च्या “पँनडेमिक – द ब्राईट साईड” चा ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड – बंगलोर’ आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’ने गौरव!

Next Post
Pandemic short film

पत्रकार नंदू धुरंधर दिग्दर्शित ‘गामा फाउंडेशन फिल्म्स’च्या "पँनडेमिक - द ब्राईट साईड" चा 'चलचित्र रोलिंग अवॉर्ड - बंगलोर' आणि 'आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड'ने गौरव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!