Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० दिवसांत नुकसानभरपाईचे आदेश

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

कोरोनाची तिसरी लाट बहुतांश ओसरली आहे. तरीही कोरोनाचं संकट संपलेलं नाही आहे. यातच सर्वोच्च न्यायालयात कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या भरपाईबाबत सुनावणी सुरु आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याबाबत तांत्रिक कारणास्तव नाकारू शकत नाही. न्यायालयाने राज्यांना फटकारले आणि म्हटले की, तुम्ही तांत्रिक कारणास्तव क्लेम नाकारू शकत नाही. तांत्रिक त्रुटी आढळल्यास संबंधित राज्यांनी त्यांना त्रुटी सुधारण्याची संधी द्यावी. यासोबतच न्यायमूर्ती एमआर शाह आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने राज्यांना सांगितले की, तुमचे हे कर्तव्य आहे आणि तुम्ही १० दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी.

 

नोडल ऑफिसर बनवण्याच्या सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य विधी सेवा प्राधिकरण (SLSA) च्या सदस्य सचिवांशी समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देता येईल.

 

सात दिवसांत संपूर्ण माहिती न दिल्यास कारवाई

  • सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना शुक्रवारपासून एका आठवड्याच्या आत नाव, पत्ता आणि मृत्यू प्रमाणपत्रांसह अनाथ मुलांची संपूर्ण माहिती संबंधित राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाला प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत.
  • तसे न केल्यास प्रकरण गांभीर्याने घेतले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

विधी सेवा प्राधिकरण पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधेल

  • कोणत्याही कारणास्तव अर्ज न केलेल्या पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा विधी सेवा प्राधिकरणाचा प्रयत्न असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
  • राज्य सरकारांनी नियुक्त केलेले नोडल अधिकारी राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांच्या संपर्कात असतील.
  • पात्र व्यक्तीचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याची असेल.

Tags: coronaSLSAstate govtSupreme Courtकोरोनाराज्य विधी सेवा प्राधिकरणराज्य सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – अजित पवार

Next Post

पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन देखरेखीसाठी पर्यावरणीय मूल्यमापन संस्था

Next Post
Powai Lake

पवई तलावाचे भौतिक आणि नैसर्गिक पुनरुज्जीवन देखरेखीसाठी पर्यावरणीय मूल्यमापन संस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!