Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मतदार यादी प्रसिद्ध; हरकती ८ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी निधी चौधरी

November 10, 2022
in सरकारी बातम्या
0
nidhi chaudhary

मुक्तपीठ टीम

भारत निवडणूक आयोगाने मुंबई उपनगर जिल्ह्याची एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मतदार याद्या सुधारित करण्यासाठीच्या ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३‘ अंतर्गत मतदारांनी ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती आणि तरुणांनी लवकरात लवकर आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘वॉकथॉन’ या जनजागृती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी केले.            

आजपासून भारत निवडणूक आयोगाने एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत असून, त्या  निमित्ताने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३  अंतर्गत आयोजित ‘वॉकथॉन’ या जनजागृती रॅलीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन युवक युवतींना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारीचौधरी बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजीत साखरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जगतसिंह गिरासे, तहसिलदार विरसिंग वसावे, तहसिलदार सचिन भालेराव, तहसिलदार मिलिंद मुंढे आणि मान्यवर उपस्थित होते.

तरूणांनो ! आपले नाव मतदार यादीत नोंदवा

जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी म्हणाल्या, “मतदान हा आपल्याला मिळालेला घटनात्मक अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,” अशी माहिती देतानाच श्रीमती चौधरी यांनी “तुमचे नाव मतदार यादीत आहे का?” असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारला. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे सांगितले. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आगाऊ नाव नोंदणी करून मतदार यादीत नाव नोंदविता येते. मतदानाचा अधिकार मात्र १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त होतो, नव तरूणांनी लवकरात लवकर आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी केले.

१८ वर्षांखालील तरुणांसाठी मतदार म्हणून आगाऊ नोंदणीचीही सुविधा            

मतदार नोंदणीसाठी पूर्वी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.  मात्र, आता २०२३ पासून  जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून आगाऊ नोंदणी करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे युवकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदानाचा अधिकार प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होणार आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली.

मतदार याद्या सुधारित करण्यासाठीचा ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३‘ यास  सुरुवात होत आहे. पूर्वी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावयाची असल्यास ती सामान्यपणे वर्षातून एकदा किंवा दोनदा करता येत असे. मात्र, आता यात सुधारणा करण्यात आली असून आता वर्षातून चार वेळा मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध होत असून, या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा सर्व मतदारांनी आवर्जून करून घ्यावी. ही यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, असेही  जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले. यासंदर्भात दावे व हरकती ८ डिसेंबर २०२२ पर्यंत  स्वीकारण्यात येतील. तर, ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे.            

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी आणि एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे.

दिव्यांग व महिलांसाठी विशेष मोहिम

दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या  दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत.

तरी, आजपासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई उपनगर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास  त्या सुद्धा कळवाव्यात, असेही आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती चौधरी यांनी केले आहे.


Tags: MaharastraMumbai Suburban Collector Nidhi ChaudharyState Election Commissionerजिल्हाधिकारी निधी चौधरी
Previous Post

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

Next Post

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र करणार सामंजस्य करार

Next Post
वेस्टमिडलँड

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र करणार सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!