Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

November 10, 2022
in सरकारी बातम्या
0
मा. बंदरे, खनिकर्म मंत्री श्री.दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील जलवाहतुकीबाबत बैठक 1

मुक्तपीठ टीम

नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.            

मंत्रालयातील दालनात मुंबईतील जलवाहतूक यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.            

बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे म्हणाले, मुंबई परिसराला लाभलेला समुद्र किनारा प्रवासी जल वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. मुंबई परिसरात राबविण्यात येणाऱ्या या विविध प्रकल्पांमुळे मुंबईतील प्रवासी जल वाहतूकीत मोठी क्रांती होणार आहे. राष्ट्रीय जल वाहतूक मार्गाअंतर्गतचे तसेच मुंबई व परिसरातील प्रवासी जल वाहतूकीचे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पर्यावरण व वन विभागाच्या सर्व अत्यावश्यक परवानग्या घेऊन हे प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावेत. मुंबईतील प्रवासी जल वाहतूक अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने जेट्टींच्या पायाभूत सुविधांचा विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा, सर्व दृष्टीने सुरक्षित अशा अत्याधुनिक बोटी, इलेक्ट्रॉनिक व सोलर बोटी यांचा समावेश तसेच बोटींची दुरुस्ती व नव्या बोटी तयार करणे यासाठी शीपयार्डची बांधणी यावर हे प्रकल्प राबविताना भर देण्यात येणार असल्याचेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या नवीन प्रवासी जल वाहतूक मार्गावरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.            

मुंबई एमएमआर क्षेत्रात प्रवासी जल वाहतूकीचे १३ मार्ग आहेत. अन्य प्रस्तावित मार्गांमध्ये सागरमाला प्रकल्पांतर्गत वसई ते भाईंदर, वसई खाडीतून जाणारा कल्याण ते भाईंदर, रेडिओ क्लब ते मिठी बंदर, बेलापूर ते मिठी बंदर, मनोरी ते मार्वे, करंजा ते रेवस, गोराई ते बोरीवली या मार्गांचा समावेश आहे. डीसीटी ते मांडवा व बेलापूर ते एलिफंटा हे प्रवासी जल वाहतूक मार्गावर वॉटर टॅक्सी आहेत. तर बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईट सिईंग व बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे मार्ग देखील लवकरच कार्यान्वित होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Tags: Dadaji BhusemumbaiPassenger Water Transport Projectप्रवासी जल वाहतूक प्रकल्पबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेमुंबई
Previous Post

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन

Next Post

मतदार यादी प्रसिद्ध; हरकती ८ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी निधी चौधरी

Next Post
nidhi chaudhary

मतदार यादी प्रसिद्ध; हरकती ८ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे आवाहन - जिल्हाधिकारी निधी चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!