Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र करणार सामंजस्य करार

इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य

November 10, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
वेस्टमिडलँड

मुक्तपीठ टीम

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.            

महाराष्ट्रात पुढील काही वर्षात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शिवडी-न्हावाशेवा सी लिंक असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत असून त्याद्वारे गुंतवणुकीच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी वेस्टमिडलँडमधील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत एकमेकांशी गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.            

लंडनपासून जवळच वेस्टमिडलँड हे राज्य वसलेले आहे. जॅग्वार, कॅडबरी आणि जेसीबीसारख्या प्रतिष्ठीत कंपन्या या भागातील आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक मराठी तरुणांनी स्टार्टअपद्वारे या राज्यात आपल्या कंपन्या सुरू केल्या असून त्यांना स्थानिक प्रशासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे दोन देशांप्रमाणे दोन राज्यामध्ये गुंतवणूक विषयक संबंध अधिक वाढावेत, अशी मागणी या बैठकीत वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.            

वेस्टमिडलँड राज्य हे इलेक्ट्रिक वाहने क्षेत्रातले मोठे हब असून त्यादृष्टीने राज्यात नवीन गुंतवणूक येण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासोबतच मुंबई ते बर्मिंगहम थेट विमानसेवा सुरू झाल्यास या दोन राज्यात पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो ही बाबही अँडी स्ट्रीट यांनी निदर्शनास आणून दिली, त्यावर  ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे नक्की पाठपुरावा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.            

वेस्टमिडलँड येथे बोरिक कॅसल, एजबर्स्टन क्रिकेट ग्राउंड, एमस्टरडम येथील सुप्रसिद्ध केनॉल अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या जागा भारतीय पर्यटकांना पहाता येतील त्यामुळे पर्यटनात मोठ्या संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असून त्यांना देखील या दोन राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास या तीन क्षेत्रात महाराष्ट्र आणि वेस्टमिडलँड यांनी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.            

या बैठकीला इयन ब्रुकफिल्ड, एलन गेमेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, नील रामी, बेथ येट्स, अभिजित आफले, आशुतोष चंद्रा हे देखील उपस्थित होते.


Tags: britainelectric vehiclesMaharashtraWestMidlandइलेक्ट्रिक वाहनब्रिटनमहाराष्ट्रवेस्टमिडलँड
Previous Post

मतदार यादी प्रसिद्ध; हरकती ८ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी निधी चौधरी

Next Post

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

Next Post
Grampanchayat

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!