Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची टीम कार्यरत

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Election Commission Of India

मुक्तपीठ टीम

“आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी” या कवि – संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या समर्पक शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दिवाळीला “सणांचा राजा” असंही म्हटलं जातं. याच दिवाळीनिमित्त अनेक मुंबईकर आपापल्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतात. तर अनेक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. मात्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व विधानसभा‘ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांपैकी अनेक याला अपवाद ठरले आहेत. निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत असणा-यांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या टीमने दिवाळीतील सर्व दिवशी निवडणूक कर्तव्यार्थ समर्पित भावनेने काम केले असल्याची माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

अशी आहे अंधेरी पोटनिवडणूक…

  • मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ – अंधेरी पूर्व‘ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.
  •  दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. 
  • या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. 
  • तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. 
  • या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. 
  • यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, 
  • मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. 

निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे ‘मायक्रो ऑब्जरव्हर‘ यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी कोणते कर्मचारी अधिकारी कार्यरत?

निवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, म्हाडा, महावितरण, कामगार आयुक्तालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाचे विविध विभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्र, असे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय केली आहे.                    

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘अंधेरी पूर्व‘ मतदारसंघात सुटी घोषित करण्यात आली आहे, मात्र ती सुट्टी हे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे; हे लक्षात घेऊन सर्व संबंधित मतदारांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून मतदान करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


Tags: Andheri Bypoll Electionselection commissionmaharshtraअंधेरी पोटनिवडणुकनिवडणूक आयोग
Previous Post

आपच्या केजरीवालांनी आता मागणी केली, पण इंडोनेशियाच्या नोटांवर का आधीपासूनच गणपती बाप्पा विराजमान? जाणून घ्या…

Next Post

प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित औटी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार

Next Post
Abhijit Auti

प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित औटी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!