Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुलडोझरची कमाल! सपा आमदारानं पक्ष निर्णय डावलत भाजपाच्या द्रोपदी मुर्मूंना मत दिलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yogi AdityaNath ANd Shahjeel Islam

मुक्तपीठ टीम

भारताच्या १६ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात सोमवारी देशभरात मतदान झाले. राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा रिंगणात आहे. मतदानादरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश विधानसभेत क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले आहे. बरेलीतील भोजीपुरा येथून समाजवादी पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम यांनी विरोधी पक्षातील यशवंत सिन्हा यांच्या जागी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहजील इस्लाम चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझरने कारवाई करण्यात आली होती.

शहजील यांनी पक्षाच्याविरोधात जाऊन मुर्मूंना केले मतदान!!

  • भोजीपुरा येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार झालेल्या शाहजील इस्लाम यांनी क्रॉस व्होटिंग केले आहे.
  • शहजील इस्लाम बरेलीचे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. शहजील इस्लाम यांनी सातत्याने योगींवर टीका केली होती.
  • त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर मालमत्तांवर कारवाई केली होती.
  • शहजील यांच्या एका पेट्रोल पंपावरही बुलडोझर फिरवण्यात आला होता.
  • अशी कारवाई करूनही पक्षाचा पाठिंबा न मिळाल्याने आमदार शाहजील इस्लाम यांनी पक्षाप्रती नाराजी दर्शवली होती.
  • लखनौमधील अनेक सभांमध्येही सहभागी झाले नाहीत.
  • एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली.
  • शहजील इस्लाम यांनी आजम खान यांनाही पाठिंबा दिला होता.
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे.
  • शहजील यांनी पक्षाच्याविरोधात जाऊन मुर्मू यांना मतदान केलं आहे.

शाहजील इस्लाम कोण आहेत?

  • शाहजील इस्लाम बरेलीच्या भोजीपुरा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. शाहजील यांच्या वडिलांना निवडणूक लढवायची होती, परंतु जेव्हा फॉर्म नाकारला गेला तेव्हा त्यांनी आधीच शाहजीलची नोंदणी केली होती.
  • त्यामुळे वडिलांच्या जागी शाहजील यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.
  • त्यांच्या वडिलांनी सपाच्या चिन्हावर नाव नोंदवले असल्याने, सपाने अपक्ष शाहजीलला पाठिंबा दिल्याने ते विजयी झाले.
  • पुढच्या निवडणुकीत ते बसपामध्ये दाखल झाले आणि दुसऱ्या विधानसभेतील आमदार पुन्हा मंत्री झाले.

Tags: BJPDraupadi MurmuMLA Shahjeel IslamNDAPresidential Electionsamajwadi partyआमदार शाहजील इस्लामद्रौपदी मुर्मूभाजपासपासमाजवादी पक्ष
Previous Post

एकनाथ शिंदेंनी नेमलेली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी ते नवे नेते!! शिवसेनेची घटना सांगते हे शक्य नाही!!

Next Post

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

Next Post
MSCE Pune

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!