मुक्तपीठ टीम
मुंबईत गोवराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आतापर्यंत मुंबईत गोवरचे १६९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गोवरमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ६४ जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशात मुंबई मनपा गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क झाली आहे.
नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न…
- मुंबईत ० ते २ वयोगटातील मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे.
- यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे.
- काहींनी एकच डोस घेतला आहे.
- तर काहींनी लसिकरणच केलेले नाही.
- त्यामुळे अशा २० हजार मुलांवर मुंबई मनपाने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे.
- त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
- ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
- गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत.
- यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे.
- धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे.
- गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.
मुंबईत रुग्णांची वाढती संख्या…
- मुंबईत २३ लाख ८७ हजार ३८६ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
- त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले २८६० संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
- जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १७६ रुग्ण आढळून आले आहेत.
- ० ते ८ महिन्याचे १८, ९ ते ११ महिने १ ते ४ वर्ष ६४, ५ ते ९ वर्षे २८, १० ते १४ वर्षे ९, १५ आणि त्यावरील ९ असे एकूण १३७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
- त्यापैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
- ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १३ हजार ९६२ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.