Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘धनुष्यबाण’ कुणाचा? ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
EC

मुक्तपीठ टीम

6कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केवळ १५ दिवसांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून सुनावणी होईल आणि मग आयोगाकडून निवडणूक चिन्ह मूळ शिवसेनेकडेच कायम राखणं किंवा शिंदे गटाला देणं किंवा दोघांच्या वादात गोठवणं यापैकी एक निर्णय येईल. पण या प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेतला तर आयोगाचा निर्णय ऐन मनपा निवडणुकीपूर्वी येण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा!

  • शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेचे बहुसंख्या आमदार आणि खासदार सोबत असल्यानं त्यांचाच गट खरी शिवसेना आणि धनुष्यबाण त्यांच्याच गटाला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • गेल्या महिन्यात आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.
  • आयोगाच्या वतीने शिवसेनेच्या विधिमंडळ आणि संघटना स्तरावरील दोन्ही गटांकडून पाठिंब्याची पत्रे मागविण्यात आली होती.
  • सोबतच त्यांना याप्रकरणी लेखी निवेदन देण्यासही सांगण्यात आले आहे.
  • शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, सरन्यायाधीशांनी घाईघाईत निर्णय न घेता योग्य मुदत देण्यास सांगितले.
  • निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला एक महिन्याची मुदत देण्यास नकार दिला.
  • पण आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
  • आयोगाने ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात!!

  • एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांनी बंडाळी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली.
  • उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
  • यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सककार आले.
  • शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
  • यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा केला.
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.
  • एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार , खासदार आणि अनेक नगरसेवक सामील झाल्याने त्यांच्या संख्याबळही जास्त आहे.
  • म्हणून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.

Tags: Eknath Shindeelection commissionShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेनिवडणूक आयोगशिवसेना
Previous Post

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

Next Post

भारतीय नौदलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

Next Post
Gallantry Awardees of Indian Navy -01 (2)

भारतीय नौदलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!