Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

August 12, 2022
in सरकारी बातम्या
0
मा.मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘घरोघरी तिरंगा’ या अभियान कार्यक्रम मंत्रालय 3

मुक्तपीठ टीम 

‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.

दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले. या अभियानात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या अभियानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होऊन प्रत्येक नागरिक या अभियानाशी जोडला जाणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. प्रत्येकाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत तिरंगा ध्वज घेऊन सेल्फी काढायची होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकापाशी थांबत सेल्फी काढत होते. यावेळी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झालं होते. भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणांनी मंत्रालय दणाणून गेले होते.

यावेळी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी महिला बचत गटाच्या विक्री दालनातून विकत घेतलेले राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. तसेच यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी स्वत: तयार केलेले लहान आकाराचे राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेट दिले.

या कार्यक्रमास मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे नोडल अधिकारी अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज रक्षाबंधन असल्याने महिला बचत गटाच्या महिलांनी आणि सलाम बॉम्बे या संस्थेच्या विद्यार्थिनींने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राखी बांधून हा सण साजरा केला.


Tags: CMEknath ShindeGhar Ghar TirangaMaharashtramumbaiघरोघरी तिरंगामहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहाच दिवस कामकाज

Next Post

‘धनुष्यबाण’ कुणाचा? ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाची शक्यता!

Next Post
EC

'धनुष्यबाण' कुणाचा? ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!