Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

August 12, 2022
in सरकारी बातम्या
0
Gallantry Awardees of Indian Navy -01 (2)

मुक्तपीठ टीम

भारतात नौदलाचे महत्त्व अनादी काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्त्व ओळखून आरमाराची बांधणी केली. भारतीय नौदलाने आपल्या बुद्धीचातुर्य व शौर्याने अनेक युद्धांत देशाला विजय मिळवून दिला. भविष्यातील आव्हाने मात्र वेगळ्या प्रकारची असतील. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातर्फे बुधवारी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त तसेच सेवेतील शौर्य विजेत्या अधिकारी व जवानांचा स्मृतिचिन्ह नेऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कुलाबा येथील नौदलाच्या कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह तसेच नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

नौसेनेच्या ज्या अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून देशरक्षणाचे कार्य केले आहे अशा शौर्य विजेत्या अधिकारी व जवानांचा सत्कार  करताना आपणांस स्वतःला गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.  जगात इजिप्त, रोम अश्या विविध सांस्कृती उदयाला आल्या आणि लयाला गेल्या, परंतु भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकून आहे, याचे श्रेय आपल्या शूरवीर जवानांना देखील आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते माजी नौसेना प्रमुख ॲडमिरल विजय सिंह शेखावत, कमांडर अशोक कुमार, कमांडर अनुप वर्मा, कॅप्टन होमी मोतीवाला,  सर्जन कमांडर अलोक बॅनर्जी, कॅप्टन कौस्तुभ विजयकुमार गोसावी, क्लिअरन्स डायव्हर आनंद सोपान सावंत व पेटी ऑफिसर आदेश कुमार या शौर्य विजेत्या माजी आजी अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नौसेना शौर्य पदक विजेत्या नौसेनेतील २९ आजी माजी अधिकाऱ्यांचा व जवानांचा देखील सत्कार करण्यात आला


Tags: Amrut mahotsavIndian NavyMaharashtramumbaiअमृत महोत्सवभारतीय नौदलमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

‘धनुष्यबाण’ कुणाचा? ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाची शक्यता!

Next Post

सर्वोच्च न्यायालय: संशयाच्या आधारे शिक्षा नाही! खून प्रकरणातून आरोपीची निर्दोष सुटका!!

Next Post
Supreme Court (2)

सर्वोच्च न्यायालय: संशयाच्या आधारे शिक्षा नाही! खून प्रकरणातून आरोपीची निर्दोष सुटका!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!