मुक्तपीठ टीम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबण्यासाठीच्या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस आतापर्यंत २८ दिवसांनी दिली जात असे. पण आता केंद्र सरकारने आता कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस देण्याचा कालावधी चारऐवजी आठ आठवड्यानंतर ठेवण्याची सूचना जारी केली आहे. आता पर्यंत या लसीच्या दोन डोसचा कालावधी ४ ते ८ आठवडे होता. तो आता ६ ते ८ आठवडे असेल. त्यामुळे अधिक चांगल संरक्षण मिळू शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे. कालावधीतील हा बदल ऑक्सफर्ड सीरमच्या कोविशिल्डपुरताच लागू असे. भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिन लसीसाठी हा कालावधीतील बदल लागू नसेल.
आतापर्यंत समोर आलेल्या वैज्ञानिक पुराव्यांवरून नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि कोरोना लसीकरणासाठीतच्या नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप या दोन तज्ज्ञ समुहांनी कोविशिल्ड लसीच्या कालावधीबद्दल पुनर्विचार केला. या लसीचा दुसरा डोस पहिला डोस दिल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता बहुधा रक्तदानाच कालावधीही बदलणार
एनबीटीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत कोरोनाची लस मिळाल्यानंतर रक्तदान न करण्याची मुदत नुकतीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर रक्तदात्यास २८ दिवसानंतर रक्त देता येईल. प्रथम डोस घेतल्यानंतर ५६ दिवस तो रक्तदान करू शकणार नाही, असे होते. आता कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी हा कालावधीही बदलण्याची शक्यता आहे.
एनबीटीसीचे संचालक डॉ सुनील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीला २८ दिवसांंनंतरच लसीचा दुसरा डोस घेतला पाहिजे. लस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतात. तसेच लसीकरणाच्या या संपूर्ण कालावधीत मद्यपान करु नये. आता मात्र बदलेल्या सूचनांनंतर कोविशिल्डच्याबाबतीत रक्तदान करण्याचा कालावधीही बदलू शकत आहे. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा.