Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महावसुलीच्या चौकशीसाठी परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parambir

मुक्तपीठ टीम

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. परमबीर यांनी त्या पत्रात राज्याचे गुहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. राज्याचे गुहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप केला होता. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंह यांच्यावरच उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात या आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावे अशी मागणी केली आहेत.

 

परमबीर सिंह यांनी पदावर असताना हे आरोप का केले नाही? तर सत्ताधाऱ्यांकडून परमबीर यांचे पत्र हे भाजपाचा कट असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या आरोपानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

आणखी काय आहे याचिकेत?

  • एकूण १३० पानांची याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष, कोणत्याही दबावाविना आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी.
  • पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
  • फेब्रुवारी २०२१मध्ये अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक झाली होती. त्याच बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे सांगितले होते.
  • रश्मी शुक्ला यांनीही अनिल देशमुखांकडून भष्ट्राचार होत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी देशमुखांएवजी रश्मी शुक्ला यांनाच सुनावण्यात आले होते.
  • अनिल देशमुख अनेक प्रकरणांच्या तपासांमध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते.
  • या सर्व गोष्टींचे दाखले परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत दिले आहेत.

Tags: anil deshmukhchief minister uddhav thackerayparambir singhsachin vazeपरमबीर सिंग
Previous Post

कोरोना लस घेतली? पहिल्या डोसपासून ५६ दिवस करु नका रक्तदान!

Next Post

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा नवा निर्णय

Next Post
vaccination १

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा नवा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!