Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यभरातील कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी

लसीकरणाची खूण म्हणून संबंधितांच्या बोटांवर लावली जाणार शाई

January 9, 2021
in सरकारी बातम्या
0
DRY run

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी, अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक नाहीतर राज्यशासन त्याची अंमलबजावणी करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल त्यावेळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

 

केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

दरम्यान, काल झालेल्या ड्रायरनचे राज्यस्तरावरुन संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले. सर्व जिल्ह्यांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन केले.

 

ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले. त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची  पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले.

 

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आले होते.

 


Tags: corona vaccination dry runcorona vaccineCorona VirusDRy Runvaccine Dry Runआरोग्यमंत्री राजेश टोपेकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनकोव्हिड-१९
Previous Post

आतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी

Next Post

पक्षीनिरीक्षणातून उलगडली मुख्यमंत्र्यांची तरल संवेदनशीलता!

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पक्षीनिरीक्षणातून उलगडली मुख्यमंत्र्यांची तरल संवेदनशीलता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!