Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पक्षीनिरीक्षणातून उलगडली मुख्यमंत्र्यांची तरल संवेदनशीलता!

January 10, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम

 

आपल्यातील संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अत्यंत व्यग्र आणि धकाधकीच्या अशा दौऱ्यातही निसर्गातील घटकांची माहिती घेतली तसेच त्यांच्या संवर्धनाविषयी जाणीवेने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. निमित्त होते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याचे.

 

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्पस्थळाला भेट दिली. या भेटीतील नियमित उपक्रमांसोबतच एक अनोखा उपक्रम होता तो या जलाशयातील पक्षीसंपदेची माहिती करून घेण्याचा. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जाणून घेण्यात मुख्यमंत्र्यांनी विलक्षण आस्था दर्शविली. जलाशयात विहार करीत असलेल्या पक्ष्यांच्या सवयी,  अधिवास,  वैशिष्टये आदींबाबतही त्यांनी विविध बाबी अतिशय औत्सुक्याने जाणून घेतल्या.

 

या प्रकल्पात निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा भ्रमण मार्ग आणि त्यांचे मुळचे अधिवासी देश यासंदर्भात माहिती घेतली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सायबेरिया, चीन, दक्षिण आफ्रिका यासह लडाख, हिमाचल आदी भागातूनही मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. त्यासोबतच त्यांनी स्थानिक पक्षांबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. येथील जलाशयात पाणकावळे, बगळे, खंड्या, ढोकरी, तुयीया अशा अनेक प्रजाती कायम वास्तव्याला असतात. त्यांच्या आवडीचे मासे मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी या परिसरातील ५० पेक्षा जास्त पक्षांचे निरीक्षण केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काही पक्षी दक्षिणेकडे जाताना त्यांचा काही काळ मुक्काम या परिसरात राहतो तर काही पक्षी अधिक काळही येथे वास्तव्याला राहतात. अमोर फालकन या पक्षाबद्दल त्यांनी अधिक माहिती घेतली. हा पक्षी सध्या लोणावळ्यात वास्तव्याला आहे. तो मंगोलियातून राज्याच्या विविध भागात येतो. या पक्षाला हिमालयासारख्या उंच पर्वतावरून उडता येत नसल्यामुळे तो  नागालँड येथून भारतात प्रवेश करतो. भारतातील वास्तव्यानंतर ते आफ्रिकेत परत जातात. या पक्षाबद्दल पक्षीप्रेमींना विशेष आकर्षण आहे स्थलांतरित पक्षी ज्या भागात येतात आणि ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे ती जागा संरक्षित करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. पक्षीनिरीक्षण हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असल्यामुळे स्थलांतरित व स्थानिक पक्षांचे जेथे वास्तव्य आहे त्यांचे वास्तव्य अधिक सुरक्षित करण्यात यावे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला अधिक चालना मिळेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरच्या गोरेवाडा परिसरात पक्ष्यांच्या २२५ पेक्षा अधिक प्रजाती आहेत स्थलांतरित पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती यावेळी त्यांनी घेतली. समृद्ध अशा पर्यटनस्थळांना संरक्षित करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या भेटीमध्ये विशेष रुची दाखवली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसरातील पक्षीनिरीक्षणासाठी पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी  निमंत्रित केले.

 

या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी पर्यटन विकासासाठी होऊ शकणाऱ्या प्रयत्नांबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निसर्गप्रेमी असून त्यांना वन्यजीवांविषयी विशेष आस्था असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र या दौऱ्याच्या निमित्ताने  या साऱ्यांतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे राजकारणापलीकडची तरल संवेदनशिलता दर्शविणारे एक मनोहारी व्यक्तिमत्व उलगडले.

 


Tags: chief minister of maharashtraMaharashtramuktpeethUddhav Thackerayपक्षी निरीक्षणमहाराष्ट्रमुक्तपीठविदर्भ
Previous Post

राज्यभरातील कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी

Next Post

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी; अशोक चव्हाण यांची मागणी

Next Post
मंत्री अशोक चौहान पत्रकार १परिषद

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी; अशोक चव्हाण यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!