Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातही ड्रायपोर्ट उभारणार! महसूल, एमआयडीसी, जेनपीटी अधिकाऱ्यांना एकत्रित पाहणीचे आदेश

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dryport

मुक्तपीठ टीम

सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत व्यवहार्यता तपासणी करावी. यासाठी महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, सांगलीतील उद्योग संघटनेचे पदाधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग मिळाला आहे.

 

सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक यांनी सादरीकरण केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या रांजणी येथे शेळी मेंढी विकास महामंडळाची २२५० एकर जमीन आहे. यापैकी २५० एकर जमीन ही औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतर केली जावी, असे नाईक यांनी सांगितले. यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी जमीन रेल्वे मार्गानजिक असायला हवी, असे सांगितले. ड्रायपोर्टबरोबरच मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित करायला हवा असेही ते म्हणाले.

 

रांजणी बरोबरच रेल्वे मार्गानजिकच्या इतरही काही ठिकाणी इनलैंड कंटेनर पोर्ट विकसित करता येईल का याची पाहणी करावी. यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणांना एकत्रित भेटी देऊन व्यवहार्यता तपासणी करावी, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

 

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी एमआयडीसीने सर्व शक्यता तपासून पाहाव्यात. यासाठी तत्काळ कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्यामध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.

 

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे सांगितले. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय दिघावकर, एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयोग मुकादम आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात एअरपोर्ट नसल्याने या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासंदर्भात केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.


Tags: DryportGNPT Officergood newsIndustry Minister Subhash DesaiMIDCmuktpeethRanjaniRevenueSangli districtउद्योग मंत्री सुभाष देसाईएमआयडीसीचांगली बातमीजेनपीटी अधिकारीड्रायपोर्टमहसूलमुक्तपीठरांजणीसांगली जिल्हा
Previous Post

ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्जदारांसाठी कर्ज व्याजात सवलत

Next Post

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये करिअर संधी

Next Post
Neyveli Lignite Corporation Limited

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!