मुक्तपीठ टीम
डीआरआय आणि आयसीजीच्या पथकाने १८ मे २०२२ रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनार्याजवळ मोठी कामगिरी बजावली. या पथकाने “प्रिन्स” आणि “लिटल जीझस” या दोन बोटींमधून २१८ किलो हेरॉईनचा साठा जप्त केला. त्या अंमलीपदार्थांची किंमत १ हजार ५२६ कोटी आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यांविरुद्ध आयसीजी आणि डीआरआयची संयुक्त मोहीम सागरी मार्गांद्वारे देशात येणारा अंमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे.
दोन भारतीय नौका तामिळनाडूच्या किनार्यावरून निघणार आहेत आणि अरबी समुद्रात कुठेतरी अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतील अशी बातमी मिळाल्यानंतर डीआरआयने ऑपरेशन सुरू केले. ७ मे २०२२ रोजी भारतीय तटरक्षक दल आयसीजी सह डीआरआयची संयुक्त मोहीम ऑपरेशन खोजबीन या सांकेतिक नावाने सुरू करण्यात आली. या ऑपरेशन अंतर्गत, डीआरआय अधिकार्यांसह कोस्ट गार्ड जहाज सुजीत, अनन्य आर्थिक क्षेत्राजवळ बारीक नजर ठेवून होते. समुद्रात अनेक दिवस सतत शोध आणि निरीक्षण केल्यानंतर, “प्रिन्स” आणि “लिटल जीझस” या दोन संशयित बोटी भारताच्या दिशेने येताना दिसल्या. १८ मे २०२२ रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनार्याजवळ आयसीजी आणि डीआरआयच्या अधिकार्यांनी दोन्ही भारतीय बोटींना रोखले होते. या बोटीतील काही क्रू मेंबर्सची चौकशी केली असता त्यांनी उच्च समुद्रात मोठ्या प्रमाणात हेरॉईन मिळाल्याची कबुली दिली आणि ते दोन्ही बोटींमध्ये लपवून ठेवले होते. त्यादृष्टीने दोन्ही बोटी पुढील कार्यवाहीसाठी कोची येथे नेण्यात आल्या.
- कोची येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात दोन्ही बोटींची कसून झडती घेण्यात आली
- प्रत्येकी १ किलो हेरॉईनची २१८ पाकिटे जप्त करण्यात आली.
- एनडीपीएस कायदा, १९८५च्या तरतुदींनुसार जप्तीची कारवाई सध्या डीआरआयकडून सुरू आहे.
- विविध ठिकाणी शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
- डीआरआय आणि आयसीजीद्वारे हे ऑपरेशन काळजीपूर्वक नियोजित आणि अंमलात आणले गेले
- अनेक दिवसांच्या कालावधीत समुद्रात व्यापक पाळत ठेवली गेली.
- जप्त केलेले अमली पदार्थ उच्च दर्जाचे हेरॉईनचे असल्याचे दिसून येत असून आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे रु. १५२६ कोटी आहे.
- आयसीजी आणि डीआरआयने यापूर्वी, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधी काही महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत.
- गेल्या एका महिन्यात डीआरआयने पकडलेला हा चौथा मोठा ड्रग्स साठा आहे.
- डीआरआयने २०.०४.२०२२ रोजी कांडला बंदरावर जिप्सम पावडरच्या व्यावसायिक आयात खेपातून २०५.६ किलो हेरॉईन जप्त केले.
- पिपावाव बंदरावर २९.०४.२०२२ रोजी ३९६ किलो धागा (हेरॉईनने बांधलेला) आणि ६२ किलो एअर कॉम्प्लेक्स कारगो येथे IGIने एकूण २५०० कोटीचा साठा जप्त केला होता.
- एप्रिल २०२१ पासून, डीआरआयने अंदाजे रुपये २६,००० कोटीचा 3३,८०० किलो पेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले होता.
- एप्रिल २०२१ मध्ये तुतिकोरिन बंदरातील कंटेनरमधून ३०३ किलो कोकेनचा सर्वात मोठा साठा होता.
- जुलै २०२१ मध्ये न्हावा शेवा बंदर येथे २९३ किलो हेरॉईन
- सप्टेंबर २०२१ मध्ये मुंद्रा येथे ३००० किलो हेरॉईन
- फेब्रुवारी २०२२ मध्ये तुघलकाबाद, नवी दिल्ली येथे ३४ किलो हेरॉईन
- अंदाजे रु.३५,००० कोटीच्या किमतीचे ३५० किलो पेक्षा जास्त कोकेन जप्त केले होते.
- आयसीजीने अंदाजे किमतीचे सुमारे ३ टन अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
- मागील ३ वर्षात विविध ऑपरेशन्समध्ये १२,२०६ कोटीचे अंमली पदार्थ जप्त केले .
- श्रीलंकन बोट शेनाया दुवा आणि रविहंसी यांच्या अटकेचा समावेश आहे, या दोघांनाही ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आले होते.
- AK-47 आणि पिस्तूल, इराणी बोट जुम्मा, पाक बोट अल हुसेनी आणि अल हज पण जप्त करण्यात आले.