मुक्तपीठ टीम
एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेटचे सबस्क्रिप्शन घेण्याची घाई करू नका. स्टारलिंकने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी सबस्क्रायबर बनवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच हजार एवढे भारतीय त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने एलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा घेणे टाळा, असा इशारा दिला आहे. सरकारने या सदस्यत्व प्रक्रियेपासून दूर राहण्याचे आवाहन केल्याने, एलॉन मस्कला भारतात योग्य प्रक्रिया पूर्ण करुन सरकारी परवानगी मिळेपर्यंत थांबावं लागणार आहे.
स्टारलिंकला अद्याप भारतात परवाना नाही!
- एलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट पुरविण्याचा परवाना अद्याप मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
- अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी स्टारलिंकची इंटरनेट सेवा सबस्क्रिप्शन घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे त्यांचेही नुकसान होऊ शकते.
- दूरसंचार विभागाने परिस्थिती स्पष्ट केली आहे
- मस्कच्या कंपनीने भारतातील नियामक प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे.
- स्टारलिंकची इंटरनेट सेवा देण्यासाठी मस्कला सरकारकडून मान्यता घ्यावी लागेल, त्यानंतरच तो कायदेशीररित्या भारतात व्यवसाय करू शकेल.
भारतात पाच हजार ग्राहकांकडून प्री-बुकिंग!
- एलॉन मस्कच्या स्टारलिंकने अलीकडेच भारतात इंटरनेट सेवेसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही माहिती उघड होताच केंद्र सरकारने लोकांना सबस्क्रिप्शन न घेण्याचे आवाहन केले आहे.
- एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंक भारतात आपली सेवा ऑफर करण्यास उत्सुक आहे.
- देशात प्री-बुकिंग सबस्क्रिप्शन पाच हजारापुढे गेली आहे.