Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी! नवाब मलिक अनिल देशमुखांच्या शेजारची तुरुंगातील खोली का बुक करत आहेत?”

भाजपा नेते किरीट सोमय्यांची मविआ सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीला आरोपांची आतिषबाजी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit somaiya

मुक्तपीठ टीम

ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांचा तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा गेल्या वर्षभरात आपण पर्दाफाश केला असून यापुढील काळातही या सरकारमधील काही मंत्र्यांचा व सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचे घोटाळे उजेडात येतील, असा दावा भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी शनिवारी केली. प्रदेश भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुलुंडमधील कार्यकर्ता संमेलनातही त्यांनी महाविकास आघाडीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त आरोपांची आतषबाजी केली.

kirit somaiya

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या बेकायदा बंगल्याचे प्रकरणही आपण उजेडात आणल्याचे डॉ. सोमैया यांनी सांगितले.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित १०५० कोटींच्या बेनामी मालमत्तेची चौकशी सुरु आहे. या संदर्भात सत्य लवकरच उजेडात येईल. ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची विविध यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मुश्रीफ यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल असेही डॉ. सोमैया यांनी नमूद केले.

डॉ. सोमैया यांनी सांगितले की, अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आदी शिवसेना नेत्यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे चौकशी सुरु आहे. मिलिंद नार्वेकर यांनी त्यांनी अलिबाग येथे केलेले बंगल्याचे अवैध बांधकाम स्वतःहून पाडून टाकले आहे. उद्धव ठाकरे व रवींद्र वायकर यांच्या बंगल्यांच्या कामाबाबतही आपण तक्रार केली होती.

kirit somaiya

परिवहन मंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टची राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून चौकशी सुरु आहे. परब यांच्या रिसॉर्टवर ५. ४२ कोटी इतका खर्च झाला असून हे रिसॉर्ट बेनामी असल्याची कबुली परब यांच्या सीए ने दिल्याचेही सोमैया यांनी सांगितले.

 

राज्यात महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी!

नवाब मलिक एवढे का घाबरत आहेत? ते अनिल देशमुखच्या शेजारची आर्थर रोड कारागृहातील खोली बुक करत आहेत का? मलिकांनी वक्फबोर्ड जमिनीचा घोटाळा केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. मग ते नवाब असो की मलिक! कोणत्याही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आतापर्यंत २८ घोटाळे काढले. कदाचित २९ वा नंबर नवाब मालिकांचा असू शकतो, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.

 


Tags: Anil ParabB J PKirit SomaiyaMahavikas Aghadi governmentकिरीट सोमैयाभाजपामहाविकास आघाडी सरकार
Previous Post

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनची घाई नको! केंद्र सरकारकडून अलर्ट!

Next Post

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा!

Next Post
eknath shinde

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!