Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली मनपाकडून आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा : नदी पात्रात बचाव प्रात्यक्षिकं

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Sangli DIsaster Management Rescue

मुक्तपीठ टीम

सांगलीचा पावसाळा म्हटलं की कृष्णा नदीचा पूर हा तसा धडकी भरवणाराच. २०१९ आणि २०२१ ही दोन वर्षे पुराचा फटका बसल्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका खास खबरदारी बाळगते. यावेळीही पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्तीपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती मदत साहित्य आणि साधनांसह नदीपात्रात प्रात्यक्षिके करण्यात आली. संभाव्य आपत्ती उद्भवलीच तर त्यावेळी लोकांची मदत आणि बचावासाठी सांगली महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

सांगलीला २०१९ आणि २०२१ मध्ये महापूराचा सामना करावा लागला होता. मात्र २०२१ मध्ये सर्व विभागांचा योग्य समन्वय साधता आल्याने कोणितीही वित्त अथवा जीवित हानी झाली नाही. यंदाच्या वर्षीही १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व यंत्रणांचा आपत्तीपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत कृष्णानदी पात्रात मदत आणि रेस्क्यूची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच सर्व आपत्ती मदत साहित्य , बोटी आणि अन्य उपलब्ध साधनांची प्रात्यक्षिके सुद्धा यावेळी घेणेत आली. सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर कृष्णा पात्रात आपत्तीपूर्व तयारीची प्रात्यक्षिके घेणेत आली. यावेळी मनपाचे उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त संजीव ओव्होळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, नगरसेवक युवराज बावडेकर , मनपाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश सावंत, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांच्यासह स्पेशल रेस्क्यू टीम, रॉयल कृष्णा बोटक्लबचे प्रतापदादा जामदार, वाईल्ड लाईफ सोसायटीचे संदीप डमडेरे, इंसाफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर, पर्यावरण प्रेमी संजय चव्हाण यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्व कर्मचारी, प्राणी, पक्षी मित्र तसेच पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी आपत्ती काळात नदी पात्रात एखादे वेळेस कोणी व्यक्ती बुडत असेल तर त्याला तात्काळ कसे वाचवता येते याचे प्रात्यक्षिक घेणेत आले.

दरम्यान, संभाव्य पूर आपत्तीसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आपल्या सर्व साहित्य साधनासह सज्ज असून संभाव्य आपत्तीकाळात नागरिकांना महापालिका प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्याचे पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Disaster Managementgood newsmuktpeethRescue DemonstrationRiver BasinSangli Miraj and Kupwad City Municipal CorporationSangli Municipal Corporationआपत्ती व्यवस्थापनकृष्णा नदीचांगली बातमीनदी पात्रबचाव प्रात्यक्षिकमुक्तपीठसांगली मनपासांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
Previous Post

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार, पहिल्या जहाजविरोधी स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Next Post

BMWचं X4 सिल्व्हर शॅडो मॉडेल भारतात लाँच! दिमाखदार, दमदार, वेगवान!!

Next Post
BMW X4 Silver Shadow

BMWचं X4 सिल्व्हर शॅडो मॉडेल भारतात लाँच! दिमाखदार, दमदार, वेगवान!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!