Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरफोडीप्रकरणी चार आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक

नवीन वर्षांच्या सेलेब्रिशनसाठी घरफोडी केल्याची आरोपींची कबुली

January 7, 2021
in कायदा-पोलीस
0
thief housebreaking

घरफोडीप्रकरणी चार रेकॉर्डवरील आरोपींना दहिसर पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. नवीन वर्षांच्या सेलेब्रिशनसाठी पैशांची गरज असल्याने या चौघांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

 

अटक आरोपींमध्ये रसुल सनी लुझारिया, शमीम मुन्ना विश्‍वास, जोहरअली मेहबूबअली शेख आणि अब्दुल रजाक अब्दुल मुनाफ अन्सारी यांचा समावेश आहे. दहिसर येथील बबलीपाडा परिसरात २९ डिसेंबरला एका फ्लॅटमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. हा प्रकार नंतर उघडकीस येताच तक्रारदारांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, परब, शेख, तटकरे, शिरसाठ, मोहिते, सांगळे, हिरेमठ यांनी जोहरअली, शमीम, अब्दुल आणि रसुल या चौघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते, त्यांच्या चौकशीत ते चौघेही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

 

नवीन वर्ष साजरा करण्यासाठी त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून पोलिसंनी सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. चोरीचे दागिने ते त्यांच्या परिचित व्यक्तींना कमी किंमतीत विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Tags: housebreakingnew yearthiefघरफोडीनवीन वर्ष
Previous Post

सावधान! सरकारच्या अधिकृत कोरोना अ‍ॅपआधीच फेक अ‍ॅपचा संसर्ग!

Next Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ४० कोटी

Next Post
Dhananjay Munde

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ४० कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!