मुक्तपीठ टीम
शेतकरी आंदोलन तापत असतानाच काँग्रेसनेही कृषि कायद्यांच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनाच्यानिमित्ताने केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींसोबत आज दिल्ली मध्ये राजभवनात मोर्चा काढला.
मोर्चाला संबोधित करताना, राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफ डागली, “हे तीन कायदे शेतकऱ्यांना संपवणारे आहेत. या देशाला स्वातंत्र्य अंबानी अदानीने नाही तर शेतकऱ्यांनी मिळवून दिले. शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य जपले आहे ज्या दिवशी देशाची खाद्य सुरक्षा जाईल, शेतकरी दुखावले जातील त्या दिवशी देशाचे स्वातंत्र्य नाहीसे होईल.”
राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी भरताला समजू शकले नाहीत, त्यांना असे वाटते की शेतकऱ्यांकडे सत्ता नाही आणि ते १०-१५ दिवसांत माघार घेतील.”
राहुल गांधींनी थेट मोदींवरही आरोप केले, “नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत. भारतातील शेतकरी घाबरणार नाहीत, आणि मागे तर मुळीच हटणार नाहीत तर तुम्हाला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील.”
जब मोदी सरकार किसानों की जमीन छीनने की कोशिश कर रही थी; तब हमने उन्हें रोका था। मोदी सरकार एक बार फिर से किसानों पर आक्रमण कर रही है: श्री @RahulGandhi #SpeakUpForKisanAdhikar pic.twitter.com/idgg0bDVBa
— Congress (@INCIndia) January 15, 2021
अलका लांबा यांना दुखापत
दिल्ली पोलिसांनी मोर्चाच्या वेळेस बॅरिकेट लावले होते. या बॅरिकेट मध्ये तारा होत्या त्यामध्ये अलका लांबा यांचा हात अडकला आणि त्या जखमी झाल्या. जखम झाल्यामुळे त्यांना रक्तस्त्राव झाला.