Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विजया मुळेंच्या संग्रहातील पुस्तके, चित्रपट आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात

प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी एनएफएआयला केला मौल्यवान संग्रह दान

January 15, 2021
in घडलं-बिघडलं, मस्तच, सरकारी बातम्या
0
NFAI Vijay Mulay-2

मुक्तपीठ टीम

प्रख्यात माहितीपट निर्मात्या आणि चित्रपट इतिहासकार विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके आणि चित्रपटांचा मोठा संग्रह आता भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग आहे. त्यांची मुलगी, प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी एनएफएआयला हा मौल्यवान संग्रह दान केला. विजया मुळे भारतातील चित्रपट समाज चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या आणि माहितीपट तसेच शैक्षणिक माहितीसाठी त्या प्रसिद्ध होत्या.

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, “हा भव्य संग्रह स्वीकारताना आम्हाला आनंद झाला. आम्ही सुहासिनी मुळे यांचे आभारी आहोत. त्यांनी एनएफएआयवर विश्वास दाखवून हे सर्व साहित्य जतन करण्यासाठी दान केले. मला खात्री आहे की हा संग्रह जगभरातील चित्रपट संशोधकांना उपयुक्त ठरेल. आम्ही सर्वाना आवाहन करतो की एनएफएआयकडे आर्काइव्ह फिल्मशी संबंधित साहित्य जमा करा, जेणेकरून ती भावी पिढ्यांसाठी जतन करुन ठेवता येईल आणि चित्रपट संशोधकांना ते सहज उपलब्ध होईल.”

NFAI Vijay Mulay

विजया मुळेंच्या संग्रहात मोलाचा ठेवा

  • व्हीएचएस मध्ये एक टीव्ही मालिका आहे ‘जई फाईट उन बीओ वॉएज’
  • इटालियन चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते रॉबर्टो रोसेलिनी यांचा तीन भागांचा कार्यक्रम आहे, ज्याचे नाव ‘हेरेक्स क्यूइ कोम रोजेली’ आहे, जो 11 जानेवारी ते 6 ऑगस्ट 1959 दरम्यान प्रसारित केला गेला.
  • सुहासिनी मुळे, तपन बोस आणि सलीम शेख दिग्दर्शित ‘भोपाळ: बियॉंड जेनोसाईड ’ (1986)’ हा माहितीपट आहे. भोपाळमधील कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात 3 डिसेंबर 1984 च्या रात्री विषारी वायू गळतीनंतर झालेल्या दुखद घटनेचे वेदनादायक चित्रण हा माहितीपट उलगडतो.

Tags: National Film ArchiveNFAISuhasini Mulayvijaya mulayभारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयविजय मुळेसुहासिनी मुळे
Previous Post

मुंडेंविरोधातील तक्रारदार महिलेचे ट्वीट, “चुकीचे आरोप होत असतील तर मीच माघार घेते”

Next Post

कृषी कायद्यांविरोधात राहुल आणि प्रियांकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा

Next Post
Rahul Gandhi Priyanka Gandhi Farmer Protest-1

कृषी कायद्यांविरोधात राहुल आणि प्रियांकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!