Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूजा चव्हाणचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतोय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pooja chavhan

मुक्तपीठ टीम

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलेल्या पूजा चव्हाणच्या पोस्टमार्टम रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पूजाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला त्याची वैद्यकीय कारणं या अहवालामुळे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाणचा ७ पेब्रुवारीला वानवडीत मृत्यू झाला होता. तिने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असे सांगितले जाते. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर भाजपानं हे प्रकरण उचलून धरत संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी राज्य सरकारवर दवाब आणला. त्यामुळे अखेर राठोडांना राजीनामा द्यावा लागला.

मणका आणि जबड्याला जबर दुखापत

पूजाने आत्महत्या केली, ती अपघाती पडली की घातपात झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मृत्यूचे वैद्यकीय कारण सांगणारा सविस्तर शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांना मिळाला आहे. ज्यामध्ये तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर झालेल्या प्राथमिक तपासातूनही जबर दुखापत हेच कारण पुढं आलं होतं. आता शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अर्थात, वानवडी पोलिसांनी याबद्दल आताच काहीही सांगण्यास नकार दिला आहे. लवकरच आम्ही माध्यमांना सविस्तर माहिती देऊ, असं पोलिसांनी म्हटलं आहे.


Tags: pooja chavhan suicidepostmortem reportsanjay rathodvanwadi policeपूजा चव्हाणपोस्टमार्टम रिपोर्ट
Previous Post

राठोड झाले, आता भाजपाचं लक्ष्य धनंजय मुंडे!

Next Post

मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?

Next Post
MKM -1

मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!