Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिलिंडर स्फोटात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक, आरोग्य समितीतून राजीनामे, यशवंत जाधवांना घेराव!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena

मुक्तपीठ टीम

वरळीतील सिलिंडर ब्लास्ट घटनेतील जखमी चार महिन्यांच्या बाळाचा नायर रुग्णालयामध्ये उपचाराअभावी काही दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. यावरुन भाजपा नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला. त्याविषयी बोलताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात आम्ही शिवसेनेचे मात्र लढतो, असे वक्तव्य केले. याच पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवक चिडले आणि  त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले होते. भाजपा नगरसेवकांनी यावेळी यशवंत जाधव यांना घेरलं.

 

नेमकं काय घडलं?

  • नायर रुग्णालयात उपचाराअभावी ४ महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.
  • हे बाळ त्याच्या परिवारासह वरळीतील सिलिंडर ब्लास्टच्या घटनेत जखमी झालं होतं.
  • या घटनेवरुन भाजप नगरसेवकांनी आरोग्य समिती सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते.
  • त्याविषयी बोलताना यशवंत जाधव यांनी भाजपाचे लोक राजीनामा देतात, आम्ही सेनेचे लोक मात्र लढतो, असं वक्तव्य केलं होतं.
  • जाधवांच्या या वक्तव्यावरुन भाजपाचे नगरसेवक चिडले आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले होते.
  • अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर भाजप-सेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला.
  • भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत.
  • भाजप नेता बोलत असतानाच शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
  • दोन्ही बाजूने जोरदार घोषणबाजी झाली.

 

वरळीत नेमकं काय घडलं?

  • वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक ३ मधील एका घरात तीन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
  • सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला.
  • त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली.
  • आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
  • अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं होतं.
  • मात्र, या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले होते.
  • यात एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश होता.
  • जखमी झालेल्या चौघांना मुंबई सेंट्रल इथल्या पालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं.
  • मात्र डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने या कुटूंबाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यातच चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Tags: BJPShivsenaYashwant Jadhavनायर रुग्णालयभाजपायशवंत जाधववरळी सिलिंडर ब्लास्टशिवसेना
Previous Post

दिव्यांग व्यक्तींच्या मतदार यादीत नावनोंदणीसाठी मुंबईत प्रयत्न

Next Post

मुलांवर लक्ष ठेवा! अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाविरोधात दिल्लीत इंटरनेटवर पॉर्न पसरवल्याची अमेरिकेची तक्रार!

Next Post
delhi police

मुलांवर लक्ष ठेवा! अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाविरोधात दिल्लीत इंटरनेटवर पॉर्न पसरवल्याची अमेरिकेची तक्रार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!