Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिव्यांग व्यक्तींच्या मतदार यादीत नावनोंदणीसाठी मुंबईत प्रयत्न

जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन

December 4, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
rajiv nivtekar

मुक्तपीठ टीम

दिव्यांग व्यक्तींनी मतदारयादीत नाव नोंदणी करु व आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांचीही नावे मतदारयादीत समाविष्ट करावी. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा  दिव्यागांना देय असलेले लाभ देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.

rajiv nivtekar

मुंबई शहर जिल्ह्यात सिवील सोसायटी ऑर्गनायझेशन व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या सहकार्याने दि.3 डिसेंबर हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र येथे साजरा करण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्ताने दिव्यांग मतदारांची नावे मतदारयादीत नोंदणी करण्याबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांचे हस्ते दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

१८१-माहिम विधानसभा मतदारसंघाच्या सहकार्याने दिव्यांग मतदारांना केंद्रीत करून मतदार नोंदणीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या अनुषंगाने माधव पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदारांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म-6 कसा भरावा व त्यासोबत कोणती आवश्यक कागदपत्रे सादर करावी याबाबत मार्गदर्शन केले.

rajiv nivtekar

कार्यक्रमास दिनेश डिंगळे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, माधव पाटील, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर, धोत्रे, सहसचिव, मंत्रालय, मुंबई, समाधान इंगळे, सहा.आयुक्त समाजकल्याण, अरूण भालेराव, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे अपटाऊन, घाटकोपर व  प्रसाद खैरनार, सहा. आयुक्त समाजकल्याण, उपनगर, प्रशांत सावंत, तहसिलदार, निवडणूक विभाग, मुंबई शहर, गुलाब मोरे, नायब तहसिलदार उपस्थित होते.


Tags: 181-Mahim Assembly constituency१८१-माहिम विधानसभा मतदारसंघHandicapped Voter Awareness CampaignRajeev Niwatkarदिव्यांग मतदार जनजागृती मोहीमराजीव निवतकर
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज…भारतीय नौदलाचे जनक!

Next Post

सिलिंडर स्फोटात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक, आरोग्य समितीतून राजीनामे, यशवंत जाधवांना घेराव!

Next Post
shivsena

सिलिंडर स्फोटात जीव गमावलेल्या चिमुरड्याच्या मुद्द्यावर भाजपा आक्रमक, आरोग्य समितीतून राजीनामे, यशवंत जाधवांना घेराव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!