Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या भूखंडांना आता जिओ टॅगिंग! खरेदीदारांना कळणार निश्चित स्थान!!

भूखंड खरेदीदारांना हप्ता भरण्यासाठी मुदतही वाढवून मिळणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
CIDCO

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये (Deserving Cases) अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सकारात्मक निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.

 

सिडकोकडून निवासी तथा निवासी व वाणिज्यिक भूखंडांची विविध योजनांद्वारे सातत्याने विक्री करण्यात येते. सदर योजनांतील भूखंडांचे आता सीमांकन करून त्याला कुंपण घातले जाणार आहे. त्याचप्रमाणे सदर भूखंडाचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्येक भूखंडावर लावला जाणार आहे. सदर फलकावर भूखंड क्रमांक, सेक्टर, नोड व भूखंडाचे क्षेत्र, बारकोड डिस्प्ले या बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे आता भूखंडधारकांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान व सीमा कळण्यास मदत होणार आहे.

 

हप्ता भरण्यासाठी मुदत वाढीचा दिलासा

  • सिडको नवी मुंबई जमीन विनियोग (सुधारित) अधिनियम २००८ मधील तरतुदींच्या अधीन राहून भूखंडांची विक्री करते.
  • सिडकोच्या भूखंड विक्री योजनेतील भूखंड शुल्काचा पहिला हफ्ता भरण्याची मुदत संपल्यानंतर यथायोग्य प्रकरणी (Deserving Cases) अर्जदाराला सदर हफ्ता भरण्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तर दुसरा हप्ता भरण्यासाठी १० महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयदेखील सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.
  • पात्र प्रकरणांमध्येच अर्जदाराला लागू असलेल्या विलंब शुल्कासहीत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे.
  • सदर मुदतवाढीनंतरही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरल्यास अर्जदारांना वाटपित केलेला भूखंड नियमानुसार रद्द होईल, अशी उपरोक्त अधिनियमात तरतूद आहे.

 

उपरोक्त निर्णयांमुळे निश्चितच सिडकोच्या विविध भूखंडांच्या योजनेत सहभागी होणाऱ्या अर्जदारांना दिलासा मिळणार आहे.


Tags: CIDCOgeo taggingnavi mumbaiनवी मुंबईसिडको
Previous Post

जेव्हा एका भारतीयासाठी अफगाणिस्तानने अर्धी एअरफोर्स केली होती तैनात!

Next Post

ईपीएफओच्या आकडेवारीनुसार भारतात रोजगाराच्या स्थितीत सुधारणा

Next Post
EPFO

ईपीएफओच्या आकडेवारीनुसार भारतात रोजगाराच्या स्थितीत सुधारणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!