Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेव्हा एका भारतीयासाठी अफगाणिस्तानने अर्धी एअरफोर्स केली होती तैनात!

'खुदा गवाह' या चित्रपटाच्या शुटींगसाठी अमिताभ बच्चन अफगाणिस्तानला गेले होते. ही त्यांची अविस्मरणीय ट्रिप होती असे त्यांनी सांगितले.

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Amitabh bacchan

मुक्तपीठ टीम

तालीबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर आता तो देश म्हणजे आपला शत्रू असंच अनेकांचं मत झालं आहे. तालिबानी सत्ताधारी पुढे कशी वागते त्यावर भारताशी असलेले त्यांचे संबंध अवलंबून असतील. मात्र, आपल्यासाठी आक्रमक अब्दालीसारखे अपवाद वगळता अफगाणिस्तानशी मैत्रीचं नातं जास्त आहे.

अशीच एक आठवण एका भारतीयाच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्ताननं आपली अर्धी एअर फोर्स तैनात केली होती त्याची!

 

जगाला मोहात टाकणाऱ्या बॉलीवूडच्या अनेक आठवणी

अफगाणिस्तानशी जोडलेल्या आहेत. अनेक चित्रपटांचे शुटिंग तिथे पार पडले आहे. त्यातीलच एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘खुदा गवा’. मझार-ए-शरीफ येथे बुज्काशी (घोड्यांवर खेळला जाणारा खेळ) चा एक सीन शूट करण्यात आला. जेव्हा त्या दृश्याचं शुटिंग सुरु होते, तेव्हा अफगाणिस्तानची अर्धी एअर फोर्स अमिताभ बच्चन आणि त्यांच्या संपुर्ण टीमच्या सुरक्षेत तैनात करण्यात आली होती. त्याचं सर्वात मोठं कारण अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह अहमदझाई बॉलिवूडचे मोठे चाहते होते आणि अर्थातच अमिताभ बच्चन यांचेही!

 

संपूर्ण शुटिंग क्रू शाही इतमामात…

  • अफगाणिस्तानच्या भारत मैत्रीची या आठवणीला आताच्या घटनाक्रमामुळे उजाळा मिळाला.
  • पण मुळात २०१३ मध्ये बिग बींनी हा संपूर्ण अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला.
  • ‘सोव्हिएतने देश सोडला आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे चाहते असलेल्या नजीबुल्ला अहमदझाई हे अध्यक्ष झाले.
  • त्याचवेळी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या खुदा गवाहचे शुटिंग अफगाणिस्तानात करण्याचे ठरले.
  • त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह शुटिंग क्रू तिथं गेला.
  • त्यांच्या संपुर्ण टीमला शाही वागणुक मिळाली.

 

व्हीव्हीआयपी पाहुण्यांसारखी सरबराई…सुपर सुरक्षा!

  • त्यांना मजार-ए-शरीफ येथे व्हीव्हीआयपी पाहुणे मानले गेले आणि विमानांसह सशस्त्र एस्कॉर्ट्स मिळाले.
  • ‘ही एक विस्मरणीय ट्रिप होती’ असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.
  • शुटिंग दरम्यान आणि इतर वेळी सुरक्षेची समस्या होती. पण सशस्त्र सैनिक रस्त्यावर सर्वत्र उपस्थित होते.
  • ‘इतके असुनही ती माझ्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय सहल होती.’ असे ते म्हणाले.
  • डॅनी, बिलू, मुकुल आणि अमिताभ बच्चन यांनी हेलिकॉप्टरने, इतर ५ हेलिकॉप्टरसह प्रवास केला.
  • पर्वतांचे हवाई दृश्य अप्रतिम होते, असे त्यांनी सांगितले.

Tags: actor amitabh bachchanअमिताभ बच्चनमजार-ए-शरीफ
Previous Post

दिवसभरात ५ हजार ९१४ रुग्ण बरे! १४ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!!

Next Post

सिडकोच्या भूखंडांना आता जिओ टॅगिंग! खरेदीदारांना कळणार निश्चित स्थान!!

Next Post
CIDCO

सिडकोच्या भूखंडांना आता जिओ टॅगिंग! खरेदीदारांना कळणार निश्चित स्थान!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!