मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली मते मांडलीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या अफाट वाढत असल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्टपणे बजावले, “आता लॉकडाऊन करायची वेळ आली आहे. कारण आपल्या यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही, पण जगानेही तोच मार्ग स्वीकारला आहे,”
मुख्यमंत्री उद्धव ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
संध्याकाळी ५ वाजता सुरु झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि निर्बंधांवर मते मांडली.
नेते काय बोलले?
लॉकडाऊनला पर्याय नाही, एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे : मुख्यमंत्री
• लोकांचे येणे जाणे कमी करणे हा विषय आहे.
• कार्यालयाच्या वेळा बदला. घरी काम करण्याची परवानगी द्या पण अजून ते झालेलं नाही.
• लसीचा दुसरा डोस देऊन पण लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोरही मांडला.
• कोरोनाची साखळी तोडणे. आरोग्य सुविधा वाढवणे, हे करावे लागेल.
• निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली, तरुणांनाही संसर्ग होत आहे.
• पंतप्रधान कडे विनंती केली आहे की, ४५ वर्षांवरील लसीकरणाला परवानगी दिली तसेच आता २५ वर्षांवरील लसीकरणाला परवानगी द्या.
• लोकांचे येणे जणे कमी करणे हा उद्देश आहे.
• कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याची नियोजन करा, पीक अवर ही संकल्पना आता बदलली पाहिजे.
• आपण सर्वांनी एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे.
• महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला पाहिजे.
• लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही.
• १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते.
• ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो.
• सध्या कोरोनासाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, राज्याची उत्पादन क्षमता १२०० मेट्रिक टन आहे. रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे.
• आम्ही कुठे कमी पडतो आहे का? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत.
• लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये.
• निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे.
• कळत नकळत प्रसार हा फार घातक.
जनभावनेचा विचार करा, आमची सहकार्याची तयारी – फडणवीस
• पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल.
• आम्ही लोकांना समजवू,
• सत्ताधारी मंत्र्यांना सांगा, रोज केंद्राकडे बोट दाखवत असतील तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा कसे करता.
• सत्ताधारी मंत्र्यांना समज देण्याची गरज.
• सत्तापक्षातील मंत्र्यांनीही राजकारण करू नये नाही तर त्यांच्ये इंटरव्ह्यू पाहिले तर आम्हाला त्याला उत्तर द्यावे लागते.
• मुख्यमंत्री आपण सत्ताधारी मंत्र्यांना समज दिली पाहिजे
• व्यापाऱ्यांचे गेले वर्ष वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत.
• हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा.
• छोटा धंदेवाला आता पूर्णपणे संपला तर तो पुन्हा उभा राहणार नाही.
• राज्य सरकारने थोडी तूट वाढली तर त्याचा आता विचार करू नये.
• मंदिरातील फुलवाले, प्रसादवाले तसंच केशकर्तनालय यांच्या पुढे काही पर्यायच नाही
• निर्बंध काही प्रमाणात असले पाहिजे. जनतेचा उद्रेक ही लक्षात घेतला पाहिजे.
• काही तर मार्ग काढावा लागेल. छोटे उद्योगांमध्ये नाराजी आहे.
• त्यांना काही तरी पर्याय द्यावा लागेल. त्यांना जी एस टी , वीज बिल भरावा लागतो ,
• दोन सूत्रांवर विचार करावा. काय काय चालू ठेऊ शकतो. ज्यांना आपण बिलकुल सुरुच ठेऊ शकत नाही त्यांना आपण काय दिलासा देऊ शकतो.
आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना द्या : चंद्रकांत पाटील
• आमदारांचा विकासनिधी २ कोटीने कमी करावा.
• कामगारांना ५ हजार रुपये द्यावे.
• कठोर निर्बंध आणि जगणं यात समन्वय साधला गेला पाहिजे
यंत्रणांवर प्रचंड ताण आहे. – एकनाथ शिंदे
• मीरा भाईंदर परिसरात फक्त चार दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा आहे.
आता उणी दुणी नको : प्रवीण दरेकर
• एकमेकांना मानसिक दिलासा देण्याची गरज आहे.
• समन्वय आवश्यक. एकमेकांची उणी दुणी निघत असतात.
• पण आपण एकमेकांच्या विचाराने पुढे जाऊ.
• काँग्रेसमध्ये एकमत नाहीत. नाना पटोले यांचे मुंबईत फलक लागलेत. लॉकडाऊन चालणार नाही, असं म्हटलं जातंय.
• इथेच बाळासाहेब थोरात म्हणत आहेत, कडक आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकमत नाही.
• उद्योग, व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करा.
• दुकान ते घर वस्तू पोहोचवण्यासाठी व्यवस्था उभी करावी, खासगी संस्थांची मदत घ्यावी, व्यापारी, छोटे उद्योजकांचा धंदा पण होईल आणि ग्राहकांपर्यत माल पोहचेल.
कोरोनावरून राजकारण थांबवा : आरोग्यमंत्री राजेश टोपे
• महाराष्ट्रासाठी एका दिवसाला ६ लाख लसी, एका आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला एक कोटी लसी लागणार आहेत.
• ५० हजार रेमडीसीविरची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या दिवसात १ लाखाहूनही जास्त लागतील.
• या विषयात कुणालाही राजकारण करायचे नाही.
• मी फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय.
• विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा मदत करावी.
• व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता भारत सरकारला सांगून दूर करावी.
लॉकडाऊन नको, मध्यबिंदू काढा : अशोक चव्हाण
• आव्हानात्मक परिस्थिती आपल्याकडे आहे.
• लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल.
• पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा.
• आपल्या राज्यात टेस्टिंग वाढवली आहे, त्यामुळे आपल्याकडे रुग्णाची संख्या जास्त दिसत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
• टेस्टिंग वाढवलं म्हणून संख्या वाढली इतर ठिकाणी असं होतं नाहीये. पण आपण आकडे लपवत नाही हेही सत्य आहे.
• कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा.
• सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी.
• महाराष्ट्राने चाचण्या वाढवल्याने रूग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे.
• कर्जफेडीसाठी गतवर्षीप्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी.
• केंद्राकडून कोरोना लसीचे वितरण रूग्ण संख्येच्या प्रमाणात होण्याबाबत विनंती करणे.
• कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील.
कडाऊनची पूर्वसूचना लोकांना द्यायला हवी – बाळासाहेब थोरात
• कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल.
• मृत्यू थांबणं यासाठी सर्वोत्तम उपाय करा.
• कटू निर्णय घ्यावा लागला तरी तो स्वीकारावा लागेल.
• कटू निर्णयाची अमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल.
• गुजरातमधून रेमडेसीवरचा साठा मिळू शकला तर पाहावे.
• इथे बैठकीला फडणवीस साहेब उपस्थित आहेत.
लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य – नाना पटोले
• आजची जी स्थिती आहे लोकांचा जीव वाचवण्याला आपली प्राथमिक राहिली पाहिजे
• ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांचा विचार केला पाहिजे.
• मृत्यू थांबणं यासाठी सर्वोत्तम उपाय करा.
• कटू निर्णय घ्यावा लागला तरी तो स्वीकारावा लागेल.