Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“इस्रायलमधील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!”

इस्रायलचे मुंबईतील शिवदुर्गप्रेमी वाणिज्यदूत कोबी शोशानी यांची माहिती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chhatrapati Shivaji Maharaj name to road in Israel

मुक्तपीठ टीम

इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले. आपण स्वतः दुर्गप्रेमी असून महाराष्ट्रातील काही शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली असल्याचे सांगून इस्रायल येथील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

कोबी शोशानी यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या महिन्यात इस्रायल-भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल-भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो, असे शोशानी यांनी सांगितले.

 

इस्रायल भारताला जल व्यवस्थापन, निःक्षारीकरण, जलसिंचन, या क्षेत्रात सहकार्य करीत असून इस्रायलने भारतात कृषी उत्पादन वाढविण्यासाठी २९ सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापित केले असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायल मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरीही स्नातकपूर्व अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध असून परकीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने इस्रायल येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

इस्रायलच्या स्थापनेवर लिहिलेली ‘एक्झोडस’ ही जगप्रसिद्ध कादंबरी आपण वाचली असून ती वाचताना अनेकदा भावुक झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय किंवा कुठल्याही परधर्मीय लोकांबाबत भेदभाव ठेवला नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. इस्रायल-भारत संबंध अतिशय सुदृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

बैठकीला इस्रायल वाणिज्य दुतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर हे देखील उपस्थित होते.


Tags: Chhatrapati Shivaji MaharajIsraelKobi Shoshanimumbaiइस्रायलकोबी शोशानीछत्रपती शिवाजी महाराजमुंबई
Previous Post

उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा आरोप

Next Post

“अस्सल मर्द हिंदूत्ववादी असता, तर गांधीजींना नाही, जिन्नाला गोळी मारली असती!” – संजय राऊत

Next Post
Mahatma Gandhi

"अस्सल मर्द हिंदूत्ववादी असता, तर गांधीजींना नाही, जिन्नाला गोळी मारली असती!" - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!