मुक्तपीठ टीम
माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायची इच्छा असेल, तर आयआरसीटीसी तुम्हाला एक उत्तम टूर पॅकेज देत आहे. ज्याद्वारे तुम्ही फक्त २ हजार ८४५ रुपयांमध्ये माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊ शकता. या पॅकेजमध्ये ट्रेनचे तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था मिळेल. या टूर पॅकेजमध्ये इतर कोणकोणत्या सुविधा असतील ते सविस्तर जाणून घ्या.
राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध
- या टूर पॅकेजमध्ये उत्तर संपर्क क्रांती ट्रेनचे नॉन एसी स्लीपर क्लासचे तिकीट मिळेल.
- आयआरसीटीसी गेस्ट हाऊस कटरा येथे २ दिवस आणि १ रात्र मुक्कामासाठी एसी रूम मिळेल.
- याशिवाय दोन नाश्ता मिळतील. तसेच, जाण्या, येण्यासाठी शेयरिंग बेसिसवर गाडी उपलब्ध असेल.
प्रवास कसा असणार?
- हा प्रवास ३ रात्री आणि ४ दिवसांचा असेल.
- पहिल्या दिवसाचा प्रवास नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून रात्री ८.३० वाजता सुरू होईल.
- रात्रभर प्रवास केल्यानंतर, तुम्ही दुसऱ्या दिवशी कटरा येथे पोहोचाल, तेथून माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता.
- यानंतर तिसर्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता कटराहून परतण्यासाठी ट्रेन असेल.
- यानंतर रात्रभर प्रवास केल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचाल.
किंमत आणि बुक कसे करावे?
- या टूर पॅकेजच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, यासाठी २ हजार ८४५ रुपये मोजावे लागतील.
- त्याचवेळी, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइल फोनवरून आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वरून ते बुक करू शकता.
- एका खोलीत राहण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ५३३० रुपये मोजावे लागतील.
- त्याच वेळी, जर तुम्ही डबल शेअरिंग रूममध्ये राहत असाल तर तुम्हाला फक्त ३ हजार २४० रुपये द्यावे लागतील.
- याशिवाय तुम्ही ट्रिपल शेअरिंगमध्ये राहत असाल तर फक्त २ हजार ८४५ रुपये द्यावे लागतील.
- त्याच वेळी, जर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुले असतील तर प्रति बेड १ हजार ८३५ रुपये मोजावे लागतील.